साहित्य : बासमती तांदूळ, दीड किलो चिकन, अर्धा किलो कलेजी, मालवणी मसाला, घाटी मसाला, गरम मसाला, कांदा - लसूण पेस्ट, सुक्या खोबऱ्याचे वाटण, तेल, दही इत्यादी..
कृती : सर्व प्रथम चिकन आणि कलेजी स्वछ धुवून त्याला आलं लसूण पेस्ट, तेल, तिखट असं सर्व लावून तासभर फ्रीझ मध्ये ठेवावे. नंतर तांदूळ स्वछ धुवून जर तुम्हाला हवे असेल तर पातेल्यात भात लावावा नाहीतर भातासाठी कुकरच्या तीन शिट्ट्या काढाव्यात. आणि नंतर चिकन आणि कलेजी वेगवेगळी शिजायला ठेवावी नंतर त्यात थोडं पाणी, तेल आणि उरलेला सर्व मसाला घालून अर्धातास मस्त उकळ काढावी. त्याच वेळी कांद्या खोबऱ्याचा, आलं - लसणाचा मसाला घालून कलेजी मस्त पैकी कढई मध्ये तेल घालून परतून घावी. भात, गरम तांदळाच्या किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर हे झणझणीत कालवण आणि कलेजी फ्राय खूपच टेस्टी लागते..नक्की करून पहा..
- श्री. अनिल वाडेकर. ( दिवा- ठाणे )
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.