अनुभवाचे बोल.. प्रोत्साहन देतांना घ्यावयाची काळजी..

पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे कुसुमाग्रजांना म्हणणारा त्यांचा विद्यार्थी मेहनती होता. प्रोत्साहन देणे वाईट नाही. बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसं आपल्या मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक प्रोत्साहनाने एखाद्याचं आयुष्य उजळू शकतं. म्हणून प्रोत्साहन द्यायलाच हवे. पण हे प्रोत्साहन कुणाला द्यावे हे मात्र आपल्याला कळायलाच हवे. मला स्वतःला काही बोटावर मोजता येतील इतके अपवाद वगळता प्रोत्साहन देण्याचा फार वाईट अनुभव आला आहे आणि सातत्याने येत आहे. आणि म्हणूनच आता मी उठसुठ कुणालाही प्रोत्साहन देतच नाही. पूर्वी समोरच्याला प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्याने कितीही फडतूस ओळी लिहिलेल्या असतील तरी तू अजून प्रयत्न कर तुला छान जमतंय लिहायला असे मी प्रोत्साहन देत होतो. पण, नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण प्रोत्साहन देणारे लोक स्वतःला मोठे साहित्यिक समजू लागलेत आणि हे लोक नंतर आपल्यालाच शहाणपणा शिकवू लागलेत. छंद म्हणून काही गोष्टी आपण करीत असतो आणि त्यातून आपल्याला समाधान मिळते. खरे तर हे फार छान आहे. पण आपण स्वतःला जर अतिशहाणे समजू लागलो आणि आमची जमातच इतरांपेक्षा वेगळी आहे असे वागू लागलो तर तुमच्या सारखे महामूर्ख तुम्हीच आहात हो. 

ज्या व्यक्तीला आपणच  काय पण इतर कुणीही प्रोत्साहन देत असेल तर त्या समोरच्या व्यक्तीने नम्र असायला हवे. पण आज ही नम्रता हरवत चालली आहे. माझं म्हणाल तर मी छंद म्हणून गातो, लोहितो, व्याख्यानं देतो. यातून मला समाधान मिळते आणि व्याख्यानांतून पैसे मिळतात. पण याचा अर्थ मी स्वतःला रफी साहेब किंवा किशोर कुमार समजत नाही. ते खूप महान गायक होते आणि त्यांच्या सारखे तेच असल्याने तसे दुसरे कुणी होऊच शकत नाही. काही गायिका स्वतःला लता मंगेशकर समजतात. अर्थात त्यांचे स्तुतिपाठक त्यांना मुद्दाम हरभऱ्याच्या झाडावर चढतात आणि या चढतात सुद्धा. अरे वेड्यांनो कुणी आपल्याला कितीही हरभऱ्याच्या झाडावर चढवूदेत पण आपल्याला स्वतःची योग्यता कळायला नको का ? आमच्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात तर अनेकांनी माझ्याकडून फुकटात बातम्या लिहून घेतल्यात आणि प्रसिद्ध झालेत. पण, बातमीचे पैसे मागितल्यावर माझ्याशी बोलणं बंद केलंय. काही लोकांनी जाहिरातीचे पैसे बुडवले.

मी फक्त समाजसेवेलाच मुळीच वृत्तपत्र काढलेलं नाही. गोरगरिबांच्या आणि महत्वाच्या बातम्या मी नेहमी विनामूल्य लिहितो आणि कायम लिहील सुद्धा. पण, वृत्तपत्र हा माझा व्यवसाय असल्याने लाख दीडलाख रुपये पगार असलेली लोकं सुद्धा पैसे बुडवतात तेव्हा मात्र नवल वाटतं. हल्ली सगळ्यांना सगळं फुकटातच हवं असतं. बाहेर तुमच्या प्रसिद्धीचे अथवा तुमचे काही छापायचे असले तर पैसे द्यावे लागतात. वाण्याच्या दुकानात तुम्हाला कुणी फुकटात सामान देईल काय हो ? मला भेटणारे तर नव्वद टक्के फुकटेच आहेत. माझ्या मदत करणाऱ्या स्वभावामुळे मी नेहमी खड्ड्यात जातो. माझी चूक मला कळली आहे म्हणून आता उठ सुठ कुणालाही प्रोत्साहन द्यायचे नाही आणि मदत सुद्धा करायची नाही हे ठरवले आहे. माणूस त्या लायकीचा असेल तरच मदत करायची नाहीतर गप्प बसायचे आता हे माझे धोरण आहे. आमची आत्ताची शब्द खड्गची टीम खूप चांगली आहे. पूर्वीचे काही तोंड लपवून पळून गेले. तर, काही बिनकामाच्यांना आम्ही ग्रुप मधून काढून टाकले. फुकट गंमत बघणारे लोक नको आहेत आम्हाला. आणि म्हणून मी माझ्या अनुभवाचे बोल सांगतोय ना.. प्रोत्साहन देतांना समोरचा कसा अथवा कशी आहे याचा हजारदा विचार करा.. नाहीतर आपल्यावर पाश्च्याताप करण्याची पाळी येते..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

18

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.