व्हॅलेंटाईन्स डे.. बेडक्यांचे बैल आणि हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्या बाया..

प्रेमासाठी आपल्या जीवनाचे सर्वोच्य बलिदान करणाऱ्या संत व्हॅलेंटाईन्स यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रेमदिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारी साजरा केला जातो. खरं तर मानवा बरोबरच पशु पक्षी आणि वृक्षवल्लीवर प्रेम करण्याचा संदेश आपल्या ज्ञानोबा, तुकोबा आणि कितीतरी संतांनी अगोदरच देऊन ठेवलेला आहे. आणि प्रेम करायला वा प्रेम व्यक्त करायला काय फक्त १४ फेब्रुवारीची वाट पाहायची असाही काही नियम नाही. प्रेम कुणाचेही आणि कुणावरही होऊ शकते. या दिवशी ते व्यक्त केल्याने आपल्या मनातील भावना ज्यांना आपले मन कळतच नाही अशा व्यक्तींना सांगायच्या असा या मागचा प्रघात आहे. हल्ली मार्केटिंगचे जग असल्याने आपला माल विकावा म्हणून या अशा प्रकारचे फंडे अनेक कंपन्यांनी बाजारात आणले आहेत आणि या माध्यमातून का होईना आनंद, प्रेम व्यक्त करण्याची एक संधी मिळते आहे व ती संधी मुळीच गमवायची नाही म्हणून खूपसे स्त्री, पुरुष, मुले, मुली हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा  करीत आहेत. काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा या गोष्टीला विरोध आहे हा भाग वेगळा. सांगण्याचा उद्देश हा की या दिवशी काही सन्माननीय अपवाद वगळता खूपशी  मुले आणि पुरुष खूपशा बेडक्यांना तुम्ही म्हणजे खूप सुंदर, तुम्ही म्हणजे आमचा जीव की प्राण असं भुलवून त्यांचे बैल बनवतात व मग शेवटी भ्रमनिरास झाला की या बेडक्यांचे जे बैल केलेले असतात ते फुटून या महिला मुलींचा अपेक्षाभंग होतो. काही स्त्रिया थोड्याश्या स्तुतीने हरभऱ्याच्या झाडावर चढतात मग या मुलींपेक्षा लवकर पटणाऱ्या आंटी लोकांना हुशार मुले अथवा पुरुष फसवतात. सगळेच पुरुष, मुले आणि आंटी मंडळी वाईट नसतात हो. पण थोड्याश्या स्तुतीने हुरळून जाणाऱ्या काही स्त्रिया सर्वस्व गमवून बसतात आणि मग नंतर भानावर येतात.

या उलट काही स्त्रिया असमाधानी असल्याने म्हणजे त्यांचे नवरे म्हातारे असल्याने कुठल्याही थराला जाऊ शकतात. हुशार पुरुष आणि मुले गळ टाकून बसलेली असल्याने यांना अलगद गळाला लावतात. अशा मुली आणि बायांनी खोट्या स्तुतीला मुळीच बळी पडू नये. कोणी कितीही काही सांगितलं तरी आपण काय आहे हे आरशासमोर उभं राहिल्यावर आपल्याला कळायलाच हवं. काही बायांना जास्त लोक प्रोपोज करणे अथवा अगदी कसलीही ऑफर करणे खूप भूषणावह वाटते. त्यांना वाटतं आम्ही खूप फेमस आहोत. पण, असं मुळीच नसतं, या बायांचा छछोरपणा पाहून यांना रस्त्यावरचा कुणीही सौम्य गोम्या बिनधास्त छेडतो. या अशा अगोदरच हाताबाहेर गेलेल्या आणि पुरुष, मुले बदलण्याची चटक लागलेल्या बायांना, पुरुषांना ज्ञान शिकविण्यात काहीच अर्थ नसतो. माझा लेखन प्रपंच हा सभ्य मुली आणि माझ्या माता भगिनींसाठी आहे. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आपल्या संस्कृतीला कोळून पिण्या इतकं निर्लज्ज कुणीच बनू नये. उद्या म्हातारे, म्हाताऱ्या झाल्यावर कुत्रं ही तुम्हाला हुंगणार नाही ही लक्षात ठेवून आनंद आनंदासारखाच साजरा करा आणि फसव्या लोकांपासून सावध रहा एवढंच तुम्हाला पटो अथवा न पटो पण माझं सांगणं आहे. बाकी इथे सर्वच सुज्ञ आहेत म्हणा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

44

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.