मनातलं पान : छंदाने आयुष्याची फुलबाग बहरते..

आल्या जन्मात मनुष्याला एक तरी चांगला छंद जोपासता यायलाच हवा. आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली बहुतांश स्त्री पुरुष दबलेले असतात. आयुष्य कधी सुरु झालं आणि आयुष्याची संध्याकाळ कधी जवळ आली हे रोजच्या धावपळीच्या दिनक्रमात लक्षात सुद्धा येत नाही. मग नजर पैलतिराकडे लागल्यावर आपण सगळं जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न केला. पण, हे करतांना जगणं मात्र राहूनच गेलं ही खंत मनाला टोचत राहते. म्हणून कितीही समस्या असल्या तरी लेखन, वाचन, फिरणे, अभिनय, गाणे, लिहिणे, कुकिंग, वृक्षारोपण, आपल्या पेक्षा लहानांना त्यांच्या वयाचे होऊन मार्गदर्शन करणे, विविध कार्यक्रमांत भाग घेणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे, समाजसेवा करणे, वीज आणि पाणी वाचवा या बद्दल जनजागृती करणे, योगासने करण्याचा छंद जोपासणे, कुठल्याही बैठ्या, मैदानी खेळात भाग घेणे, गरजवंतांना मदत करणे इत्यादी तुमच्या आवडीचे कुठलेही छंद तुम्ही जोपासू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे माणसे जोडायला शिका. इतरांसाठी, घरातल्यांसाठी तर तुम्ही आयुष्यभर गधा मेहनत केलेली असते. आता थोडेसे स्वतःसाठी जगा.. 

हल्ली बरेचसे लोक गोड गोड बोलून तुमच्याकडून मेहनत करून घेतात आणि तुम्ही ती करता. पण हे करतांना तुम्ही त्या लोकांसाठी स्वतःच्या कार्यक्रमांवर आणि स्वतःच्या आनंदावर फुली मारता. असे अजिबात करू नका सर्वात अगोदर तुम्ही स्वतःच्या आनंदाचा विचार करा.. कारण आता तुम्ही पंचवीस, तीस वयाचे नसता तर तुम्ही चाळीशी पन्नाशी आणि साठी पार केलेले असता. अनेक सेवानिवृत्त लोकांना काही मंडळी मोडीत काढतात. पण हे चूक आहे या लोकांनी मुळात स्वतःला म्हातारे न समजता त्यांच्या अनुभवाचा लाभ तरुणांना द्यावा. विविध प्रकारचे कार्यक्रम घ्यावेत. फार जास्त पैसे खर्च केले म्हणजेच कार्यक्रम चांगला होतो असे नाही, तुम्ही वीस तीस लोक एकत्र जमले छानशी गाणी गायली सोबत हसून खेळून चहापाणी घेतला तरी वेळ आनंदात निघून जातो. कारण एकमेकांची सुख दुःख वाटून घ्यायला व मदत करायला तुम्ही एकमेकांना भेटायला हवं.. कुठलाही चांगला छंद आपले आयुष्य संपन्न करतो आणि आपल्याला आनंद देऊन जातो असे माझे स्पष्ट मत आहे.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

66

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.