मनातलं पान.. इतरां बरोबरच कधी तरी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा..

तसे पाहिल्यास स्वतःसाठी वेळ काढणारे फार कमी लोक आहेत.. आणि माफ करा पण असे स्वतःचं स्वतः पुरते बघणारे लोक खूप आत्मकेंद्री असतात.. अशा लोकांना नेहमी इतरांचं अटेन्शन हवं असतं, सहानुभूती हवी असते. आणि हे लोक गरज सरो वैद्य मरो.. या टाईपचे असतात. यांचं काम असलं की मग हे लोक तुमच्याशी गोड गोड बोलून त्यांचा कार्यभाग साधून घेतात. अर्थात त्यांचं हे स्वार्थी वागणं तुम्हाला ठाऊक असतं. पण, तुमच्या मनाचा मोठेपणा असल्याने तुम्ही अशा लोकांना मदत करताच. 

रोजच्या जगण्यात आपल्याला असे अनेक स्त्री पुरुष भेटतात ज्यांना गरज पडल्यावरच आपली आठवण येते. एरव्ही तुम्ही जगलात की मेलात याची यांना काही पडलेली नसते.. माझ्यासारखी व्यक्ती तर अनेकांना नेहमी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. पण, मी घोड्याला फक्त पाण्या पर्यंत नेऊ शकतो, पाणी प्यायचे की नाही हा सर्वस्वी घोड्याचा प्रश्न असतो. 

जग बदललंय.. भावनेला किंमत देणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे आणि स्वतःचे वय विसरून कंबरेचं डोक्याला गुंडाळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. असो, अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि म्हणूनच असे सांगावेसे वाटते की इतरांसाठी वेळ काढाच कारण आपण माणुसकी जपणारी माणसे आहोत. पण, हे करतांना आवर्जून स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःकडे बघायला शिका आणि आपल्या आवडी निवडी जोपासा. एकच गोष्ट स्पष्ट्पणे सांगू इच्छितो की तुम्ही कुणासाठी कितीही आणि काहीही करा पण त्याची जाणीव ठेवणारी माणसे फार कमी असतात. आणि म्हणूनच इतरांना आनंद देतांना तुमचा स्वतःचा आनंद हरवणार नाही याची मात्र सदैव काळजी घ्या..

- प्रा. दिपक जाधव.. संपादक शब्द खड्ग..

38

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.