मनातलं पान : हा छंद जीवाला लावी पिसे आणि शब्द खड्ग..

मनातलं पान : हा छंद जीवाला लावी पिसे आणि शब्द खड्ग..

मित्रांनो अगदी दहावी अकरावीला असल्यापासून म्हणजे गेल्या वीस वर्षां पेक्षा जास्त वर्ष मी स्वतःच्या हिमतीवर विविध कार्यक्रम करतोय. ज्या मध्ये काव्योत्सव असतील, व्यख्यानं असतील, अभिनय असेल, सामाजिक उपक्रम असतील, ज्येष्ठ आणि गरजवंतांसाठी कार्यक्रम असतील, पोलिसांसाठी वैद्यकीय शिबिरं असतील, पोलिसांसाठी पथनाट्य असतील, शॉर्ट फिल्म असतील, पूर्ण सिनेमा आणि असं बरंच काही. तेव्हा शब्द खड्गचा जन्म सुद्धा झाला नव्हता. शब्द खड्ग वृत्तपत्राचा जन्म १५ ऑगस्ट २०१४ साली झाला. म्हणजे आता त्याला उणीपुरी दहावर्ष होऊन गेली. आणि विशेष म्हणजे याच्या त्याच्याकडे बेगमी केली नाही आणि याच्या त्याच्या जीवावर तर मुळीच काही केले नाही. भले आमचे कार्यक्रम गरिबीत झाले असतील पण ते स्वतःच्या पैशाने आणि स्वबळावर झाले असल्याचा मला रास्त अभिमान आहे.  समाजसेवा, गायन, लेखन - दिग्दर्शन, अभिनय आणि वक्तृत्व माझ्या रक्तातच आहे. माणसाला आनंदी आणि व्यस्त रहायचे असेल तर कुठला ना कुठला चांगला छंद जोपासायलाच हवा असे माझे स्पष्ट मत आहे. आणि फक्त मीच छंद जोपासत नाही तर माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन देत आलो आहे. मी पूर्वी पासून कॉलेजात गातोय. गाणं मला मुळीच नवीन नाही, पत्रकारितेच्या पदवी आणि पदव्युत्तरला निमंत्रित व्याख्याता म्हणून शिकविण्या अगोदर कितीतरी वर्ष मी वक्तृत्व स्पर्धा गाजविल्या आहेत आणि हे मला लहानपणापासून ओळखणाऱ्या सगळ्यांना ठाऊक आहे. शब्द खड्गच्या माध्यमातून नवोदितांना आणि घरकाम करणाऱ्या माता भगिनींना, ज्येष्ठांना आणि लहानग्यांना मंच मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील आहे. आणि म्हणूनच वेळोवेळी गायन स्पर्धा, सौन्दर्य स्पर्धा, हळदीकुंकू, विविध क्षेत्रांत काम केलेल्या महिलांना सावित्रीबाई पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, आणि वेळोवेळी आपल्या शब्द खड्गने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा उत्साह वाढविला आहे. आणि आजवर आम्ही जमेल तसे कार्यक्रम करीत आलो आहे. 

मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की माझी शब्द खड्गची टीम भले छोटी आहे पण सगळी  मंडळी जीवाला जीव देणारी आहे. आमच्यात एकमेकांवर जळणारे असे कुणीच नाही आणि पळपुटे, गद्दार सुद्धा कुणीच नाही. जे काही असेल ते तोंडावर बोलतो आम्ही. माझा नेहमी हा कटाक्ष असतो की आपल्या बरोबरच्या प्रत्येकाला आपण मान दिला पाहिजे आणि म्हणून आमच्या प्रत्येक कार्यक्रमात आमच्या टीम मेम्बर पैकी एकाला आम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष करतो. आणि ही संधी आणि हा मान आम्ही प्रत्येकालाच देत आलोय आणि कायम देऊ. आजवर शब्द खड्गने इतके कार्यक्रम केले पण आजवर मी कधीच कुठल्याच कार्यक्रमाचा अध्यक्ष झालो नाही आणि होणारही नाही. कारण फक्त स्वतःच चमकायचं आणि स्वतःच्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचं हे माझ्या रक्तातच नाही. माझ्या सोबत असलेले सगळे जीवाला जीव देणारे माझ्या पेक्षा कितीतरी पटीने पुढे जावेत ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणूनच मी आमच्या ग्रुपच्या प्रत्येकाच्या पाठी लागून हे करा ते करा असं सतत सांगत असतो. शब्द खड्ग ग्रुप आहे म्हणून मी आहे. मी एकटा काहीच करू शकत नाही. पाय जमिनीवर ठेवून अहंकार सोडला आणि प्रामाणिक मेहनत केली की यश तुमच्या ओंजळीत येते हा माझा अनुभव आहे. शब्द खड्ग टीम लागा कामाला आपल्याला खूप पुढचा पल्ला गाठायचा आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

52

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.