शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने डोंबिवली महिला पोलिसांसाठी घेतलेला जागतिक महिला दिन सोहळा धुमधडाक्यात संपन्न..

शनिवार ८ मार्च २०२५ डोंबिवली विभागात असलेल्या सर्व पोलीस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी, महिला पोलिस, महिला होमगार्ड, रेल्वे स्वच्छक महिलावर्ग, पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या  महिला वकील, आणि रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला इत्यादींचा शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने केला महिला दिनी सव्वाशे ते दीडशे महिलांचा सत्कार..

पोलिस महिलांच्या कार्याचा सत्कार आणि सन्मान करण्याच्या उद्देशाने शब्द खड्ग वृत्तपत्राने डोंबिवलीतील रेल्वे पोलिस विभागातील महिला अधिकारी, महिला पोलिस, महिला होमगार्ड,  महिला वकील आणि रेल्वेत स्वच्छता करणाऱ्या महिलांचा शब्द खड्गचे संस्थापक - संपादक प्रा. दिपक जाधव, साईली बनसोडे, सुनिल बनसोडे, शिवाजी जाधव, बाबू जाधव, रविकांत जाधव आणि विलास चव्हाण या शब्द खड्गच्या टीम तर्फे प्रमाणपत्र, गुलाबाचे फुल आणि पेढे देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डोंबिवली लोहमार्ग रेल्वे पोलिस इन्चार्ज श्री. किरण उंदरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक रेखा थोरात, पोलिस उपनिरीक्षक अनिलराज सोनार, पोलिस उपनिरीक्षक विजय तायडे, पोलिस उपनिरीक्षक राजू आखाडे साहेब आणि त्यांचा महिला पोलिस स्टाफ तथा होमगार्ड महिला, रेल्वे स्वछता महिला कर्मचारी आणि पुरुष पोलिस सुद्धा उपस्थित होते. शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी जागतिक महिला दिन म्हणजे नक्की काय हे सांगतांना पुराणातल्या महिलांपासून आज पर्यंतच्या महिलांची माहिती दिली. आणि सावित्रीबाई फुले ते बाबासाहेब आंबेडकर यांची उदाहरणे दिली. उंदरे साहेबांनी झाशीच्या राणीचे उदाहरण देऊन महिला कणखर असतात हे सांगितले त्याचबरोबर पोलिस महिला कशा असतात व अन्याय विरोधात त्या फिर्यादींना कशी मदत करतात तथा एकूणच महिलांनी कसे असावे यावर मार्गदर्शन केले. महिला पोलिस हवालदार मृणाल कांबळे यांनी महिलांविषयी बोलतांना सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज यांची उदाहरणे दिली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा एड. कोलते मॅडम यांनी या दिवसाचे महत्व सांगतांना महिलांनी महिलांना मदत करावी आणि एकमेकींचे दुश्मन होऊ नये असा सल्ला दिला. जोंधळे कॉलेजच्या उपप्राचार्या अदिती पाटील यांनी महिलांनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतलेली आहे आज महिला सगळीकडे पुढे आहेत असे सांगितले. माया गुरव आणि साईली बनसोडे तथा पीएसआय रेखा थोरात यांनी महिलांना महिला दिन निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पीएसआय अनिलराज सोनार साहेब आणि पीएसआय विजय तायडे साहेब तथा मृणाल कांबळे यांनी सुंदर गाणी पेश केली. उंदरे साहेब आणि त्यांच्या टीमच्या आदरातिथ्याने शब्द खड्ग टीम भारावून गेली तर सर्व महिला तथा पोलिस अधिकाऱ्यांनी शब्द खड्गने आमची आठवण ठेवून आमचा सत्कार केला या बद्दल शब्द खड्ग टीमचे आभार मानले.  

शब्द खड्गने दुसरा सत्कार विष्णूनगर पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस तथा होमगार्ड महिलांचा केला यावेळी विष्णुनगरचे इन्चार्ज संजय पवार साहेब यांनी व येथील महिला पोलिसांनी शब्द खड्गचे आभार मानले. तिसरा सत्कार वाहतूक विभागाच्या महिला पोलिसांचा करण्यात आला. या विभागाचे इन्चार्ज श्रीराम पाटील साहेबांना दिपक जाधव सरांचे आभार मानले. शब्द खड्गने पुढील दोन सत्कार एसीपी सुहास हेमाडे साहेबांच्या साक्षीने येथील दोन डिपार्टमेंटमधील महिला पोलिस अधिकारी आणि महिला पोलिस तथा होमगार्ड महिलांचा केला. या प्रसंगी असे सत्कार काम करण्यास हुरूप देतात अशा भावना एसीपी सुहास हेमाडे साहेबांनी व्यक्त करून शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव यांचे विशेष कौतुक केले. यावेळी एसीपी विभागाच्या  सीमा बेडेकर आणि सारिका माने यांनी शब्द खड्गचे आभार मानले. 

शब्द खड्ग वृत्तपत्र नेहमीच मेहनती व्यक्तींचा सत्कार करीत आलेलं आहे असं दिपक सरांनी सांगितलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शब्द खड्ग टीम पाठीशी उभी राहिल्याचा भावना शिवाजी जाधव, सुनिल बनसोडे, रविकांत जाधव, बाबू जाधव आणि विलास चव्हाण यांनी बोलून दाखविल्या. सरते शेवटी संपादक प्रा. दिपक जाधव यांनी सर्व पोलिस स्टेशन, तेथील महिला, पुरुष पोलिस अधिकारी, महिला पोलिस शिपाई, होमगार्ड महिला , स्वच्छता काम करणाऱ्या महिला, एसीपी हेमाडे साहेब, उंदरे साहेब, संजय पवार साहेब, श्रीराम पाटील साहेब, सोनार, तायडे, थोरात, आखाडे साहेब या सर्वांचे आणि शब्द खड्ग टीमचे आभार मानले..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

50

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.