शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी रविकांत जाधव यांच्या मोठ्या वहिनी श्रीमती नलिनी जाधव यांचे आज मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी कल्याण येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले..
नलिनी वहिनी यांनी जाधव कुटुंबासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी त्यांचे छोटे दीर राजाराम जाधव यांचा मुलगा रोहन याचे त्याच्या बालपणापासून संगोपन केले. रोहन बीई बीटेक आहे. अत्यंत कष्टाळू, उत्साही आणि रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून त्या पंचक्रोशी आणि नातेवाईकांत सुपरिचित होत्या. वैतरणा मोडकसागर येथून त्यांची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांचे पती कृष्णा जाधव हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामाला होते. कृष्णा यांनी ते सेवेत असतांनाच शहापूर येथे फ्लॅट घेऊन ठेवला होता. कृष्णा यांच्या निधनानंतर त्या शहापूर येथे राहायला आल्या. त्या नंतर ट्रीटमेंटसाठी त्यांच्या भावाकडे कल्याणला काही दिवस राहत होत्या. त्यांच्या पश्च्यात पुत्रवत संगोपन केलेला रोहन जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैतरणा मोडकसागर येथे कार्यरत असलेला छोटा दीर आणि समाजसेवक म्हणून सुपरिचित असलेले आनंद जाधव तथा सर्वात छोटे दीर असलेले शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी तथा गायक रविकांत जाधव, नणंद नंदा धामणकर, बहीण, भाऊ तथा पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. नलिनी वहिनींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घ्यायला शब्द खड्गच्या वतीने शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव आणि कल्याण, मुंबई परिसरातील जाधव कुटुंबियांचे नातेवाईक तथा मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
- प्रा. दिपक जाधव संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.