मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरामधून जे रोज ट्रेन ने प्रवास करतात त्यांना विंडो सीटचे महत्व कळेल. मित्र मैत्रिणींनो त्यासाठी मुंबईकरच हवं बरं का.
बिल्डिंग, गाड्या आणि माणसांची तुफान गर्दी असलेल्या मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला कधीकाळी विंडो सीट भेटली तर तो स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मिनिटा मिनिटाला माणसांचा महापूर येणाऱ्या या शहरात पोटापाण्यासाठी रोजच खूप धावपळ असते. इथे फोर्थ सीट मिळाली तरी लोक खुश होतात म्हणजे विचार करा किती कठीण झाला आहे रेल्वेचा प्रवास. उभ्याने आणि दरवाज्यात लटकत प्रवास करणारे लोक दरवर्षी खाली पडून मृत्युमुखी पडतात. हे सारं फार भयंकर आहे. आणि म्हणूनच विंडो सीट म्हणजे लोकल प्रवाशाला लागलेली लॉटरी आहे असे मला तरी वाटते. म्हणून हे सर्व माझ्या मोबाईल मध्ये क्लिक करण्याचा मोह मला आवरला नाही..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.