शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. रस्ता तोच आहे .. - प्रा. दिपक जाधव..

मुंबई मेहनत करणाऱ्या कुणालाच उपाशीपोटी निजू देत नाही हे जरी खरे असले तरी इथे टिकून राहणे तितकेसे सोपे नाही. रस्ता तोच आहे. पण, माणूस बदलला आहे. बदल हा माणसाचा स्थायी स्वभाव असला तरी आज टीचभर पोट आणि वीतभर आभाळ बघण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे..

इमारतींच्या जंगलात घरातून सहजगत्या आभाळ बघणे हे जणू स्वप्नवत झाले आहे. कित्येक वर्ष रस्ता तिथेच पहुडलेला आहे आणि आपण मात्र रस्त्यापेक्षा वेगाने धावतो आहे. स्पर्धा पोटाची, जगण्याची आणि इथे टिकण्याची आहे.. क्षणभर खिडकीत उभे राहून बाहेरची जाणाऱ्या येणाऱ्यांची वर्दळ बघणे हाही एकप्रकारचा टाईमपास आहे. पण काही घरांमधून रस्ता दिसत नाही. श्वास कोंडलाय तरी माणूस गाव सोडून शहराकडे धावतोय.

शहरातल्या मानसिक आणि नैसर्गिक प्रदूषणात आपल्या आयुष्याची किमान पाच दहा वर्ष कमी होत आहेत याची कुणालाच खंत नाही.. पुन्हा तीच खिडकी, तोच रस्ता आणि गल्लीबोळातून ट्रॅफिकशी स्पर्धा करीत धावू पाहणारी स्वप्नं टिपली आहेत प्रा. दिपक जाधव यांनी..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..

69

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.