शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूं है.. - प्रा. दिपक जाधव..

रेल्वेचा भरलेला डबा..क्वचित दिसणारा रिकामा डबा आणि चौथ्या सीट साठी चाललेली लढाई.. चालायचंच. यालाच तर आयुष्य म्हणतात. रोजच्या प्रवासात आपल्याला अनेक सहप्रवासी भेटतात. आणि रोजची तीच ट्रेन आणि तेच कंपार्टमेंट असेल तर मग आपल्याला सर्वच ओळखतात. मात्र, जवळीक फार कमी लोकांशी होते. आपण आपल्या मनातल्या भावभावना अगदी मोजक्या लोकांना सांगतो. रेल्वे फलाटावर असल्यावर आपल्या भावना वेगळ्या असतात. तेव्हा आपल्याला डब्यात शिरायचं असतं. त्यावेळी आपण आतल्या लोकांवर चरफडत असतो की हे लोक आपल्याला सहजा सहजी आत का येऊ देत नाहीत. मात्र, तेच आपण डब्यात शिरल्यावर आतले होऊन जातो आणि आता बाहेरच्यांनी डब्यात घुसून गर्दी करू नये असा प्रयत्न करतो.

रोज कामाला जाणारे आणि घरी संध्याकाळी, रात्री परतणारे लाखो स्त्री - पुरुष आणि त्यांचे वेगवेगळे भाव भावना घेऊन वावरणारे चेहरे. कुणाला कसली चिंता आहे, कुणाचं काय बिनसलंय अथवा कुणी किती आनंदी आहे. आपल्याला याचा शक्यतो कसलाच थांगपत्ता नसतो. सगळीकडे चेहरेच चेहरे काळे, गोरे, उंच, बुटके, मध्यम आकाराचे अगदी साधे तर कधी अगदी मेकअपने रंगवलेले..

रेल्वे रूळ तिथेच असतात ते कधीच धावत नाहीत. मात्र, रेल्वे आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचवत असते. अगदी न कुरकुरता.. आणि मग अगदी अनाहूतपणे एखाद्या परतीच्या प्रवासात आठवणींची गोळाबेरीज मांडत असतांना लेट नाईट एखादी संपूर्ण रिकामी सीट भेटते.. आपल्यातही खूप लोकांच्या वाट्याला अशी रिकामी सीट कधी ना कधी येतेच. मग आपण ही सीट आपल्याला शेवटच्या स्थाना पर्यंत साथ देईल असे मनातल्या मनात ठरवतो. पण, खूपदा असे होत नाही. रेल्वे ब्रिजवर मी फक्त माझ्या स्वतः पुरताच अथवा पुरतीच असे पक्के ठरवून प्लेन चेहऱ्याने वावरणाऱ्या घरी परतणाऱ्या प्रवाशांसारखी ही सीट आपल्याशी वागते. आणि मग पुन्हा आपण हंस अकेला असे म्हणत सिने में जलन आंखो में तुफान सा क्यूं है.. इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूं है.. असे म्हणत विचलित होतो..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..

164

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.