शब्द खड्ग.. माझी फोटोग्राफी.. कशासाठी पोटासाठी.. - प्रा. दिपक जाधव..

पोटासाठी दाही दिशा म्हणतात किंवा कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी.. असेही म्हणतात.. आनंद असो वा दुःख.. पोटाला भूक लागते. भुकेला रंग रूप जात पात नसते. भूक ही भूक असते. ऐंशी वर्षा पेक्षा जास्त वय असलेले राम लक्ष्मण पाटकर  हे मंगळूर येथून डोंबिवलीस पोटापाण्यासाठी आलेले सद्गृहस्थ. गेल्या पन्नास - साठ वर्षां पासून बदलत्या डोंबिवली शहराचे ते साक्षीदार आहेत.

१९७८ सालापासून फुटपाथवर ते भाजीचा धंदा लावतात. वयपरत्वे आता हवी तशी मेहनत होत नाही असे ते बोलतात. पण, काम केले नाही तर आपल्याला फुकट खायला कोण देणार असाही प्रश्न विचारतात. जोवर हात पाय चालतात तोवर काम करीत राहायचं असा ते तरुणांना संदेश देतात. ते सतत कार्यरत आहेत म्हणून इतकी वर्ष जिवंत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पाटकर आजोबांच्या मेहनती पासून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना मी माझ्या मोबाईल मध्ये टिपलं आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

63

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.