बाहेर पाऊस असो अथवा नसो. सुख दुःखाची चर्चा करायला नेहमीच चहाची टपरी आणि एक कटिंग चहा आपल्याला सोबत करीत असतो..
आयुष्याची काय गम्मत आहे ना, कधी चहाच्या पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहापावडर, अद्रक, वेलची आणि चहामसाल्या बरोबर सुख उकळत असतं तर कधी दुःख याच चहाच्या पातेल्यात आपल्या वेदनेला उकळवीत असतं. चांगलं असो वा वाईट चहाच्या एका घुटक्याबरोबर आनंद आणि वेदना आपल्या पोटात जात असते. मरगळलेल्या आयुष्याला तरतरी आणणारं पेय म्हणजे चहा. बाहेर भिजलेला उघडा बोडका रस्ता असतो. पण, हा रस्ता खूप प्रामाणिक असतो. तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकासाठी सदैव खुला असतो. हा रस्ता कधीच माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही, मी खूप बिझी आहे अशी कारणं देत नाही. तो आपल्या माणसांसाठी वेळ काढतोच आणि सोबतीला चहा या नात्याची रंगत आणखी वाढवीत असतो. माणसाचं आणि चहाचं असंच नातं टिपलं आहे प्रा. दिपक जाधव यांनी..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..
Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.