शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र प्रथम वर्धापन दिनाच्या आपणांस हार्दिक शुभेछया..

आज मंगळवार ३० जुलै २०२४ बरोबर याच तारखेला ३० जुलै २०२३ रोजी शब्द खड्गच्या पहिल्या डिजिटल अंकाचे डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थानाच्या विनायक हॉल मध्ये प्रकाशन झाले होते..

बघता बघता एक वर्ष सरले.. माझ्या सवयीनुसार कुठलीही चांगली गोष्ट घडतांना मी अपंग - वृद्ध आणि अनाथांना माझ्या कुवतीनुसार काहीतरी खायला देतो. आजही दिवसाची सुरुवात भिकाऱ्यांना खाऊ घालूनच  केली.. 

खरे पाहिल्यास १५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची छापील स्वरूपातील पहिली आवृत्ती डोंबिवलीच्या कागदे हॉल मध्ये प्रकाशित झाली होती. आपल्या वृत्तपत्राने समाजातील सर्वच अंगांना नेहमीच स्पर्श केला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, गुन्हे, देश-विदेश, आर्थिक घडामोडी, नवीन लोकांना संधी मिळावी म्हणून अनेकांना लिहिते, गाते केले.. मात्र, कोरोना काळात सर्वच व्यवसायांची बऱ्यापैकी वाट लागली. कागद तर अगोदरच खूप महाग असल्याने आता धावत्या जगाबरोबर स्पर्धेत टिकायचे तर आपला पेपर डिजिटल स्वरूपात असावा असे वाटले.

आपल्या पेपरकडे केंद्र सरकारचे कायदेशीर वृत्तपत्र नोंदणी आणि प्रकाशन प्रमाणपत्र असल्याने तशीही काही अडचण नव्हतीच. मग गुगल सोबत शब्द खड्गचे रजिस्ट्रेशन केले आणि ३० जुलै २०२३ पासून आपला पेपर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ऑन लाईन प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. 

डिजिटल वृत्तपत्राची गुगल बरोबर हात मिळवणी असल्याने याचा असा फायदा होतो की, यात अगदी तीन तासांचा व्हिडीओ सुद्धा आपण पोस्ट करू शकतो. गुगल यासाठी वर्षातून एकदा चार्ज आकारीत असते. पण, प्रिंट काढण्यापेक्षा हे खूपच सोयीस्कर पडते.. आणि आता आपलं वृत्तपत्र अगदी २४ तास सुरु असल्याने वर उल्लेख केल्या प्रमाणे जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण देतो. दैनंदिन बातम्यां बरोबरच आपण नवोदितांना तथा जुन्या जाणत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थोडा है थोडे की जरुरत है, गीत बहार ही गाण्याची सदरं चालवीत आहोत, सोबत रेसिपी आणि जावे म्हणींच्या गावा, तुमच्या मनातल्या कथा - कविता, माझी फोटोग्राफी.. वैयक्तिक आणि विविध संस्था संघटनांचा परिचय.. अशीही सदरं सुरु आहेत. आजच्या आपल्या पहिल्या वर्धापन दिनी मी आपणांस असे आवाहन करीत आहे की  वाचक मंडळीं पैकी कुणाकडे काही वेगळी कला असेल तर त्यांनी नकीच त्याचा व्हिडीओ आम्हाला पाठवावा आम्ही त्याला शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात प्रकाशित करू.

या वर्षभराच्या डिजिटल वाटचालीत माझ्या घरच्या लोकां बरोबरच इतर अनेकांनी सहकार्य केले. त्यात माझे सर्व पत्रकार, विशेष प्रतिनिधी, शब्द खड्गचे सर्व पदाधिकारी कॅमेरामन, वेब डेव्हलपर, वाचक, हितचिंतक, मार्गदर्शक, मित्रमंडळी आणि जाहिरातदारांचा  मोठा वाटा आहे. नेहमी प्रमाणे अनेक चांगले वाईट अनुभव आले. पण, मी वाईटातून आणि टीकेतून नेहमीच प्रेरणा घेत असतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपलं शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र अशीच यशस्वी घोडदौड करीत राहील असा मी आपणांस शब्द देतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राच्या प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेछया..

- प्रा. दिपक संभाजी जाधव.. संस्थापक / मुख्य संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

266

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.