मनातलं पान : आपले आणि परके..

आपले आणि परके यातील सीमारेषा फार पुसट असते फक्त ती रेषा आपल्या पटकन लक्षात येत नाही. किंवा येऊनही आपण त्याकडे छे असं होऊच शकत नाही असं आपल्या मनाशीच बोलून दुर्लक्ष करतो. पण या आपल्या परक्यांमध्ये माणुसकी असलेल्या माणसाची मानसिक ओढाताण होते आणि दहा दगडांवर पाय ठेवणाऱ्या स्वार्थी माणसांना मात्र याचा काहीच फरक पडत नाही. कारण या स्वरूपाची लोकं इज्जत कोळून पिलेली असतात व स्वतः भयंकर दिलफेक असल्याने  वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गुंतलेली असतात. व या लोकांना स्वतःचे फॅन वाढविण्यासाठी हे लोकं अगदी कुठल्याही अगदी कुठल्याही थराला जाऊ शकतात. 

जे आपले असतात ना ते आपल्याशी भांडतात. हे करू नको ते करू नको असं वारंवार सांगतात. त्यांना आपली काळजी असते. आपले वाईट होऊ नये व कुणी आपल्या मैत्रिणीचा  शारीरिक गैरफायदा घेऊ नये म्हणून सतत तिला सावध करीत असतात. कारण खूपदा आपल्या मित्र मैत्रिणीचे आणि आपले अनेक कॉमन फ्रेड असल्याने कोण किती पाण्यात आहे हे आपल्याला ठाऊक असते. आणि म्हणूनच आपण आपल्या चांगल्या मैत्रिणीला काही इजा आणि दगा फटका होऊ नये म्हणून सावध करीत असतो. काही चांगल्या मैत्रिणी हे ऐकतात कारण त्यांना त्यांच्या इज्जतीची, घरातल्या मंडळींची आणि आपल्या काळजीची जाणीव असते. पण, काही मैत्रिणींना त्या खूप स्वैर स्वभावाच्या असल्याने हेच थिल्लर लोक आवडत असतात. मग या मैत्रिणी आपल्यालाच मुर्खात काढतात. दुर्दैव हे असतं की आपल्याला हे ठाऊक असतं आपली ही मैत्रीण खूप दिलफेक आहे. पण, तरीही आपण तिच्या काळजीपोटी ती आपलं ऐकत नसतांनाही तिला रोखण्याचा खूप प्रयत्न करतो कारण आपण चांगले असतो म्हणून.. 

आणि परके लोक फक्त त्यांची गरज काढून घेण्यापुरते आपल्या आयुष्यात येतात. कारण त्यांना अनेक ऑप्शन असतात. आणि शोकांतिका ही आहे की दुनिया नेहमी थिल्लर लोकांनाच मान सन्मान देते. माझ्या मेहनती आणि कष्टाने पुढे आलेल्या माता भगिनींना त्या राहणीमानाने खूप साध्या सरळ असल्याने भाव देत नाही. ही दुनिया भपकेबाजांची आहे. ग.दि. माडगूळकर म्हटल्या प्रमाणे ' पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार.. अजब तुझे सरकार.. उद्धवा अजब तुझे सरकार..' मी स्वतः अनेकांना आणि अनेकींना खूपदा वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. खूप जणांनी ऐकलं आणि ज्यांनी नाही ऐकलं ते आणि त्या प्रामाणिक आणि चांगल्या चालीचे नसल्याचे त्यांनी त्यांच्या वागणुकीने अनेकदा सिद्ध करून दाखविले आहे. तात्पर्य काय तर भिकाऱ्यालाही भीक देतांना हजारदा विचार करा की तो त्या लायकीचा आहे की नाही.. मी हे माझ्या अनुभवाचे बोल बोलतोय बरे. माफ करा पण, पुरुषांपेक्षा गद्दारी करण्यात बाया जास्त पुढे असल्याचे अनेक तज्ज्ञ मंडळींचे मत आहे. म्हणून आपले कोण आणि परके कोण हे ओळखायला शिका नाहीतर नंतर एखादा एखादी गद्दारी करून पळून गेली तर खूप वाईट वाटते. आणि सोबत पाश्च्याताप होतो तो यासाठी की आपल्याला माहित होते ही गरजेपुरती किंवा हा गरजेपुरता आहे तरी आपण याला आपले काळीज कापून दिले.. तुमच्या आयुष्यात जर कुणी असे असेल तर सावध राहा.. पुढच्याच ठेच पाठचा शहाणा....

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

27

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.