मनातल्या वाटांवर..

मनातल्या वाटांवर आपण अनुभवलेल्या भल्या बुऱ्या आठवणींच्या पाऊलखुणा आपल्याला नियमित भेटत असतात. आपल्यापैकी खूप लोक जगण्याचा सोहळा करण्या ऐवजी माझं तुझं करण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालवतात. जे चाललंय ते आज आणि आताच आहे. काल घडलेलं नेहमीच उगाळीत बसण्यात काही अर्थ नाही. त्या कालच्या घटनेतून धडा जरी घेतला तरी गायी म्हशी सारखं तेच तेच रवंथ करीत बसण्यात गंमत नसते. आणि उद्याचा आपण इतकाही विचार करू नये की ज्यात आपला आज हरवला जाईल आणि चिंतेत वाया जाईल. रोज आपल्या मनात आठवणीचं कोळिष्टक विणलं जात असतं. आयुष्य सारीपाटाचा आणि बुद्धीबळाचा डाव आहे आणि माणसं त्यातील सोंगट्या.. काही माणसं इतकी स्वार्थी असतात की ती वेळेनुसार आपल्याला वापरून टाकून देतात. गरज सरो आणि वैद्य मरो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. काही माणसं प्रचंड रागीट असतात राग सतत त्यांच्या नाकावरच असतो. तर, काही माणसं आतल्यागाठीची असतात. तोंडावर गोड बोलतात मात्र पाठून कुटील कावा करतात. काही जणांना खूप इगो असतो. तर काही माणसं आपण जीव जरी दिला तरी आपल्यावर विश्वास ठेवतच नाहीत. अशा माणसांना समजावून सांगत बसण्यात नाहक वेळ वाया घालविण्यात काही अर्थ नसतो. जसजसा वेळ पुढे सरकत जातो तसतशी या माणसांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. मात्र, त्यातही काही मंडळी गीर गया तो भी टांग उपर अशी असतात.

आपण समोरच्यासाठी काय काय केलंय याची त्यांना जाणीव असते. मात्र, त्यांचा अहंकारी स्वभाव हे मान्य करायला तयार नसतो. अहंकार जास्त दिवस टिकत नाही हो, जरा समोरच्याचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यायचं असतं. पण, ही प्रचंड इगो असलेली माणसं आपलं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. कधी कधी ऐकलेलं आणि पाहिलेलं सुद्धा खोटं असतं हे यांना मान्य नसतं. त्यात धोका असा होतो की आपल्याला जळवायला ही अशी माणसं नको त्याचा सहारा घेतात आणि तो नको तो यांची पुरी वाट लावतो. कधीकधी तर समोरच्याची जिरविण्याची नादात अशा नादान लोकांना आपली इज्जत सुद्धा गमवावी लागते. आणि खूपशा महिला याला बळी पडल्या आहेत. त्यात काही महिला अशा ही आहेत की माझी इज्जत गेली तरी चालेल पण समोरच्याचा नाक ठेचा करायचा. काही महिला प्रसिद्धी मिळविण्यासाठी शॉर्टकटच्या नादात कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळतात. तरुण मुली नादान असतात एखाद्यावेळी आपण त्यांची झालेली फसगत अनुभव नसल्याने होते असे समजू. पण, पन्नाशी पार केलेल्या बाया पैसे आणि प्रसिद्ध होण्याच्या नादात चुकीची माणसं निवडून इज्जतीचं खोबरं करतात आणि या खोबऱ्याची चर्चा जेव्हा एखाद्याच्या तोंडून अथवा माध्यमांतून ऐकायला वाचायला मिळते तेव्हा नवल वाटते. का ? फक्त आपल्याशी न बोलणाऱ्याला माझ्यात किती दम आहे हे दाखविण्याच्या नादात तोंड काळं करायला अशा महिला  मागं पुढं पाहत नाहीत, हे बघून फार दुःख होतं. शेवटी ज्याचं त्याचं आयुष्य आहे कसेही जगा. मात्र, मनातल्या वाटेवर तुम्हाला हात आणि साथ देणारी व्यक्ती  तुम्ही विसरला अहात. तुम्ही जरी गद्दारी केलीत तरी नियती तुम्हाला पुन्हा त्याच तुमच्या भल्यासाठी एकेकाळी झिजलेल्या माणसासोबत घेऊन जाणार आहे हे मात्र कधीच विसरू नका..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

20

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.