प्रॉमिस डे ची सुद्धा मोठी गंमतच आहे नाही.. आई वडिलांना व्यवस्थित सांभाळण्याचे स्वतः स्वतःला प्रॉमिस करायचे, भाऊ- बहिणींशी , पती-पत्नीशी, मित्र- मैत्रिणींशी आणि देशाशी प्रामाणिक राहून आपल्या बरोबर सगळ्यांची कशी प्रगती होईल याचे स्वतःच्या मनाला प्रॉमिस करायचे आणि प्रत्यक्षात तसे वागायचे सोडून आपल्या पैकी खूप लोक तरुण, म्हाताऱ्या प्रियसी अथवा प्रियकरांशी प्रामाणिक राहण्याचे प्रॉमिस करतात. पण हे लोक मुळीच प्रामाणिक राहत नाहीत. काही अपवाद वगळता यातील बहुतांश स्वार्थी आणि गरजेपुरते असतात. पत्रकार आणि समाजकारणी म्हणून मी वकील, पोलीस, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, डॉक्टर आणि अनेक या क्षेत्रात काम करण्याऱ्या जाणकारांच्या नेहमीच संपर्कात आहे. त्यांच्या मते डेज वगैरे सब झूठ आहे. आणि प्रॉमिस करून एखाद्या चांगल्या मुलाला अथवा माणसाला फसविण्यात ९० टक्के मुली आणि महिला आघाडीवर असतात. जितक्या पटकन महिला अथवा मुली एखाद्याला फसवतात आणि सरड्या सारखे रंग बदलून दुसरा पकडतात तेवढे फास्ट पुरुष आणि मुले कधीच नसतात. आणि हो ही निरीक्षणे पुरुषांनी मांडलेली नाहीत तर महिलाच महिलां बद्दल मांडत आलेल्या आहेत. काही महिला वय झालं तरी तरुण दिसण्याचा भडक मेकअप करून उगीचच अट्टाहास करतात. अर्थात आपल्या बापाचं काय जातंय म्हणा. त्यांचे आई वडील भाऊ बहीण आणि नवऱ्यांना हे चालतय तर आपल्याला काय करायचं म्हणा. या महिला मुली जे रिल बनवतात त्याखाली खूपसे लोक भयंकर अश्लील प्रतिक्रिया नोंदवतात. पण, लाज कोळून पिलेल्यांना याचं काहीच वाटत नाही. अश्लीलता पसरवणारे हे प्रकार कायद्याने बंद व्हावेत.
सगळ्याच महिला मुली अशा नसतात हो.. माझ्या काही माता भगिनी खूप छान रिल बनवितात पण त्यांना कुणी विचारीत नाही आणि अश्लील बाया मुलींना मात्र प्रोत्साहन देतात. सगळीच लोकं वाईट नसतात हो. पण आपण आपल्या पुढच्या पिढीला काय संस्कार देतोय याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. अश्लील पोस्ट टाकणाऱ्यांवर आणि व्यभिचार पसरविणाऱ्या महिला पुरुषांवर कायदेशीर कारवाई करण्याची नितांत गरज असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. शाहीर दादा कोंडके म्हटल्या प्रमाणे 'ऐंशी वर्षाची म्हातारी वय सांगते सोळा, काय इप्रित झालं आंधळा मारतो डोळा'.. किंवा 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा'.. आणि आधुनिक वाल्मिकी असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते सुप्रसिद्ध गीतकार तथा गीत रामायणकार ग.दि. माडगूळकर यांनी म्हटल्या प्रमाणे 'लबाड जोडिती इमल्या माड्या गुणवंतांना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार'.. अगदी खरंय चांगल्या महिला पुरुषांच्या वाट्याला भयंकर स्ट्रगल आहे आणि छछोर स्त्री पुरुषांना मात्र हा समाज मोठेपणा बहाल करतो. प्रेम म्हणजे व्यभिचार नव्हे आणि अश्लीलताही नव्हे. पण काही लोकांनी प्रेमाला बदनाम केले आहे. तात्पर्य काय तर स्वतःशी, देशाशी, आई-वडिलांशी, आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या जिवलगांशी प्रामाणिक राहण्याचे वचन स्वतःच स्वतःला देऊन तसे प्रत्यक्षात वागा म्हणजे मग कुठल्या डेची कधीच गरज पडणार नाही..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.