मनातलं पान : ' मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया..'

कधी कधी आयुष्यात अनेक चिंता आणि संकट येतात.. माणसं आपल्या जवळ येतात आणि स्वतःची चूक लक्षात न घेता आपल्या पासून दूर निघून जातात. पण, म्हणून जगणं सोडायचं नसतं. आई नसलेलं तान्हं बाळ सुद्धा या दुनियेत जगतं.. कुणाच्या असण्या नसण्याचा खेद करीत बसलं तर आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. फार कमी लोकांना आयुष्यात सुख मिळतं. आणि खूप मोठ्या प्रमाणात या दुनियेत दुःख आहे. पण, म्हणून जगणं सोडायचं नसतं.. आणि हेच महान शायर साहिर लुधियानवी यांनी सांगितलं आहे.. आपण आयुष्या बरोबर चालत रहायचं. जे आपले असतात ते काहीही झालं, आपल्यापासून दूर जरी निघून गेले तरी पुन्हा आपल्या जवळ येतातच. आणि जे आपले नसतात ते काहीही करा आपल्याशी फक्त भांडण्याची कारणं शोधून दूर निघून जातात. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कुणालाच काहीही मिळत नाही मग तुम्ही कितीही मेहनत करा.. आणि म्हणूनच जे मिळालंय त्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे.. अधिक चांगलं मिळवण्याच्या नादात आपल्या हातातलं सुटून जातं हे आपल्याला कळतच नाही.

काही मंडळी कधीच स्पष्ट बोलत नाहीत सतत समोरच्याला झुलवत ठेवतात अशी मंडळी कधीच कुणाचीच होऊ शकत नाहीत. कारण या मंडळींना स्वतः व्यतिरिक्त इतर कुणातच कसलाच रस नसतो आणि ही मंडळी दुनियेची भेकड असतात. आणि म्हणून जे गेलं ते कधी आपलं नव्हतंच असं समजून आपण पुढे निघायचं. आणि शेवटी मनाची अशी अवस्था होते की आता मनाला ना दुःखाची ना आनंदाची पर्वा असते फिकीर असते. जे समोर येईल जसं येईल तसं बिनधास्त जगायचं असतं. परिस्थिती कशीही असो सगळ्या गोष्टींना बिनधास्त निधड्या छातीने सामोरं जायचं असतं.. समस्या अनेक येतात जातात. पण त्या घुबडा सारख्या हृदयाला लावून सतत तेच तेच घोकत बसायचं नसतं.. आणि म्हणून तर साहिल लुधियानवी म्हटले आहेत ना.. ' मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया..' आणि म्हणूनच आपण बिनधास्त जगायचं.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

47

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.