मनातलं पान : एकटेपणा जागरूकता दिन..

१५ फेब्रुवारी अर्थात एकटेपणा जागरूकता दिन..

कधी कधी गर्दीचा खूपच त्रास होतो. खूपदा माणूस गर्दीत सुद्धा मनाने एकटाच असतो. एकटेपणा काही काळासाठी खूप सुखावह वाटतो. पण, कायमस्वरूपी एकटेपणा माणसाला वेड लावू शकतो. माणसाच्या तना, मनावर हा एकटेपणा ओरखडे करायला सुरुवात करतो व माणूस आतून ढासळू लागतो. म्हणूनच जागतिक पातळीवर १५ फेब्रुवारी हा दिवस एकटेपणा जागरूकता दिन म्हणून संपन्न होतो. खरं तर कुणीच कुणाला एकटं पाडू नये. मग ते मित्र, मैत्रिणी असोत, कुटुंब असो अथवा प्रियकर प्रियसी असो.. आपण टीव्ही, मोबाईल कितीवेळ  पाहणार,. एखाद्याशी चॅटिंग तरी किती वेळ करणार. एक वेळ अशी येते की सामोरा समोर बसून बोलायला चालायला कुणीतरी पार्टनर असावा असे वाटते. आणि त्यात काही गैर नाही. आनंद आणि दुःखात आपल्याला सोबतीची गरज भासतेच. खूप आनंद झाला आहे अथवा खूप दुःख झालं आहे आणि ते शेअर करायला सोबत कुणीच नसेल तर त्या आनंदाचा आणि दुःखाचा अजिबात प्रभाव पडत नाही.

माणूस हा माणूसवेडा प्राणी आहे आणि तो तसाच असायला हवा. आयुष्यात अनेक लोक येतात. काही मंडळी सुख  दुःखात आपल्या सोबत राहतात तर काही मंडळी फक्त सुखाचे सोबती असतात, त्यांची गरज सरली की ते ढुंगणाला पाय लावून गुपचूप पळून जातात. आपण लोकांच्या गर्दीत असायलाच हवं. मात्र, ती गर्दी 'खाव खुजाव बत्ती बुझाव'.. अशा लोकांची नसावी. हे लोक आपल्याशी प्रामाणिक असायला हवेत आणि आपणही त्यांच्याशी प्रामाणिक रहावं.. एकटेपणा आणि एकांत यात खूप फरक आहे हो. एकांत आपण थोडा वेळ स्वतःला शांतता मिळावी म्हणून मागत असतो. तर, एकटेपणा हा आपल्यावर उद्भवलेला असतो. मग कारण काही का असेना. मात्र एकटेपणा फार भयंकर असल्याने आम्ही वारंवार सांगत आलोय त्या प्रमाणे कुठलेही चांगले छंद जोपासा आणि ज्यास्तीत जास्त चांगल्या आणि तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या माणसांच्या संपर्कात रहा.. एकला चालो रे.. प्रत्येकच वेळी फायद्याचे नसते..उलट आपल्या जिवलग लोकांबरोबर चाललो तर सुख वाढते आणि दुःखाची तीव्रता कमी होते..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

66

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.