श्री समर्थ कृपा स्पेशल निड स्कुलच्या विद्यार्थ्यांसोबत मैत्रेय चा वाढदिवस संपन्न..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे  संपादक प्रा. दिपक  जाधव यांचा श्री समर्थ कृपा स्पेशल  निडचे संचालक श्री. विनोद सूर्यराव  यांनी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन केला सत्कार..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संस्थापक तथा संपादक प्रा. दिपक जाधव यांचा मुलगा चिरंजीव मैत्रेय याचा वाढदिवस डोंबिवली पूर्वेच्या श्री समर्थ कृपा स्पेशल निड स्कुलच्या मुलांसोबत आज सोमवार दिनांक २४ मार्च २०२५ रोजी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मैत्रेय तर्फे मुलांना स्नॅक्स आणि भेटवस्तू दिल्या. मैत्रेयला शुभेछया देण्यासाठी श्री समर्थचे सर्वेसर्वा आणि दिपक सरांचे परममित्र श्री. विनोद सूर्यराव सर हजर होते.  या प्रसंगी शिक्षिका सुप्रिया देशमुख, भाग्यश्री जाधव, सुनीता जयस्वाल ताई आणि श्री समर्थचा सर्व स्टाफ हजर होता. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे  संपादक प्रा. दिपक  जाधव यांचा श्री समर्थ कृपा स्पेशल  निडचे संचालक श्री. विनोद सूर्यराव  यांनी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन केला सत्कार.. विनोद सूर्यराव एकहाती प्रसंगी स्वखर्चाने हे स्पेशल स्कुल चालवीत आहेत. विद्यार्थ्यांच्या फी वर शाळेचा एवढा मोठा डोलारा पेलणे एकट्या सूर्यराव सरांच्या आवाक्या बाहेरचे आहे. तरी सुद्धा ते आणि त्यांचा स्टाफ हिंमत न हरता लढत आहेत. दानशूर व्यक्तींनी या शाळेला मदत केली तर अनेक गरजवंत मुलांचे भविष्य उज्वल होईल..

अधिक माहितीसाठी संपर्क :

श्री. विनोद सूर्यराव. संचालक श्री समर्थ कृपा स्पेशल निड स्कुल डोंबिवली पूर्व. फोन नंबर -  ९१५८३४६९०३

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

85

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.