आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं..

आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं..जाग आली तेव्हा मला काही कारण नसतांना फारच अस्वस्थ वाटलं.. अ हं.. चुकताय हो तुम्ही.. अस्वस्थ माझ्यासाठी नाही तर माझ्या काही चांगल्या आणि वाईट मित्र मैत्रणींसाठी..

काय पडलं स्वप्नं.. अहो, तेच तर सांगतोय ना.. मला स्वप्नात असं दिसलं की सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप इत्यादी इत्यादी असं सारं काही खूप नियम अटी लादून सुद्धा लोक ऐकतच नसल्याने कायमचं बंद केलं गेलंय.. फक्त फोन घेता येतोय आणि करता येतोय.. अरेच्या..!! आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष.? आज ना उद्या असं होणारच आहे. काही सन्माननीय आणि चांगल्या चारित्र्यवान स्त्री, पुरुष, मुली, मुलांना वगळून बोलतोय बरे.. हे असे होणारच होते. युट्युबवर काही चांगले पुरुष आणि महिला सोडून बाकी इतर पैसे मिळविण्यासाठी जो तोंड रंगवून आणि अर्धनग्न अवस्थेत अश्लील हावभाव करून नंगानाच करतात ते बघून आज ना उद्या असे होणारच होते म्हणा. पुरुष नागडा नाचला तरी त्याला कुणी विचारीत नाही. पण, महिलांचं तसं नसतं ना हो.. काही मुली आणि महिला इतक्या बेशरम असतात की यांना  बाप, भाऊ अथवा नवरा, मुलं आहेत की नाही हा प्रश्न पडतो.. आणि जर असतील तर ते भाडखाऊ असतील असे स्पष्टपणे म्हटल्यास वावगे ठरू नये. कला सादर करणे मुळीच गुन्हा नाही. पण, त्या कलेत पैसे मिळविण्यासाठी अश्लीलता मिसळणे हा खरे तर गुन्हा आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी बरीचशी छोटी मुलं, मुली हे बघत असतात..

पुढे येऊ घातलेली एक पिढी आपण नंगानाच करून बरबाद करीत आहोत याची जाणीव ठेवावी. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी सुद्धा सन्माननीय अपवाद वगळता काही म्हाताऱ्या आणि काही म्हातारे तरुण तरुणींना लाजवतील असे तोंड रंगवून चाळे करतात.. अश्लील कपडे आणि हावभाव असलेले व्हिडीओज संबंधितांनी बॅन करून टाकावेत आणि या लोकांची खाती कायमची बंद करून टाकावीत असे वाटते. आणि हेच स्वप्नं पडलं हो पहाटे पहाटे मला.. स्वप्नातून जाग आल्यावर मला माझ्या चांगल्या मैत्रिणी आणि मित्रांचं खूप वाईट वाटलं. कारण हे लोक समाजाच्या हिताच्या खूप चांगल्या गोष्टी माध्यमांच्या साहाय्याने मांडीत आहेत. खूप जनप्रबोधन होतं या विविधांगी व्हिडीओने.. तर दुसरं वाईट माझ्या दिवसभर गाव हुंदडून दिवेलागणीला गोठ्यात येणाऱ्या गायी सारख्या मैत्रिणींचे वाटले हो.. आता या नटमोगऱ्या यांची पावडरने रंगवलेली तोंडं आणि उतू चाललेली जवानी कुणाला दाखविणार हो.. नंतर मलाच माझी खूप लाज वाटली आणि खूपच अपराधी असल्यासारखं वाटलं हो.. यांना दाखवायला लाज वाटत नाही आणि बघणाऱ्यांना बघायला लाज वाटत नाही. तर, मी कोण लागून गेलो हो टिकोजीराव यांच्याकडून चांगली अपेक्षा करणारा. आता यांचं पोट आणि प्रसिद्धी यांच्या अश्लील चाळ्यांवरच अवलंबून आहे आणि म्हणून यांच्याच भाषेत बोलायचं तर यांचे फॅन खूप जास्त आहेत. खरंय हो तुमचं सॉरी बरे.. अपेक्षा सुद्धा सुसंस्कारी आणि ऐकणाऱ्यांकडूनच करायची असते म्हणा.. आणि शेवटी स्वप्नं हे स्वप्नच असते.. ते नेहमी सत्यात उतरतेच असेही नाही म्हणा..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

29

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.