समाजकारणी, संपादक, लेखक - दिग्दर्शक आणि त्याही पेक्षा एक तळागाळात आणि गरजवंत दीन दुबळ्यांबरोबर वावरणारा सामान्य माणूस म्हणून मला नेहमीच वेगवेगळे चांगले आणि वाईट अनुभव नियमित येत आहेत. रोज आपल्याबरोबर वावरणारी माणसं जरा कुणी जास्त पैसे दिले की आपल्याला ओळख द्यायला विसरतात. मला अशा माणसांची खूप गंमत वाटते. फक्त थोड्याशा पैशांसाठी सरशी तिथे पारशी असं हे लोक वागतात. बरं वागले तर वागले पण मग अशा लबाड आणि लालची माणसांची आपल्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत होत नाही. हे लोक आपण समोर आलो की नजर चोरतात. या महामूर्ख माणसांना एवढं सुद्धा कळत नाही की एका जत्रेने देवाचे केस पिकत नाही. पूर्वी मी खूप रेहम दिल होतो पण आता अशा माणसांना अजिबात सोडायचे नाही. एक वेळ सापाला सोडा पण अशा गद्दारांना अजिबात सोडायचे नाही असे मी ठरविले आहे. लोक माझ्या चांगूपणाचा फायदा घेऊन खूपदा बातम्या आणि इतर सुद्धा विनामूल्य लिहून घेतात. खरं तर या येडझव्या लोकांना आपल्या बरोबर संपादक आहे हेच कळत नाही. मी फ्रेंडली आहे म्हणून हे मला गृहीत धरू लागलेत. चूक माझीच आहे मी कुठल्याही दोन टक्क्यांच्या लोकांना मित्रत्वाने वागवतो. ज्यांची बौद्धिक लायकी नाही अशा लोकांना ते पैसे देतात म्हणून काही लोक यांचे बाप, भाऊ समजतात तेव्हा खूप नवल वाटते. वीस वर्षांपेक्षा जास्त वर्ष मी छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करतोय पण माझ्या नजरेतून शेवटच्या खुर्चीवर बसलेला माणूस त्याला मानसन्मान दिल्याशिवाय सुटत नाही. आयला औकात नसलेली माणसे वेडेचाळे करतांना दिसली की खूप खचकते. पैसे माणुसकी पेक्षा नेहमीच मोठे ठरतात ही शोकांतिका आहे. आणि तोंड भरून समोरच्याशी दोन शब्द बोलायला काय सरकारला टॅक्स भरावा लागतो की काय ? मी नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून वेगवेगळं शिकत असतो.
मागे एका कार्यक्रमात मी चाळीस वकिलांबद्दल एका कमी शिक्षित मित्राला त्याने खूप विनंती केल्या मुळे लिहून दिले. या मित्राने लोकांचा पेपर चालवायला घेतला आहे. या मित्राचे शिक्षण जेमतेम आहे. पण, तो संपादक म्हणून बसतो. गंमत आहे अशा कुणालाही उठून अशी मोठी पद खरेतर कायद्याने देता येऊ नयेत. मी चाळीस वकिलांचे एकहाती लिहून दिले, याचे पुस्तक छापले गेले आणि या माणसाने मला माझ्या मेहनतीच्या पंधरा टक्केच रक्कम दिली. मी म्हटलं जाऊदेत आपला मित्र आहे. पण, मुख्य कार्यक्रमाच्या वेळी ही व्यक्ती इतका भाव खाऊ लागली की माझ्याशी बोलायला महाग झाली. मी कार्यक्रम सुरु झाल्यावर अर्ध्या तासात तिथून घरी निघून आलो. यावेळी माझ्यासोबत माझे परममित्र आणि आपल्या शब्द खड्गचे कायदेविषयक सल्लागार एड. प्रदीप बावस्कर सुद्धा होते. या पुस्तकात मी बावस्करांची सुद्धा माहिती लिहिली होती. बावस्करांना म्हटलं तुम्ही थांबा आणि तुमचा पुरस्कार घेऊन या. त्यानंतर दोन तीन तासांनी या माणसाने मला फोन केला आणि माझी माफी मागितली. मी त्याला काय सुनवायचे ते चांगलेच सुनावले आणि लगेच त्याला फक्त माझ्या फोन मधूनच नाही तर आयुष्यातूनही कायमचे डिलिट करून टाकले. माणुसकी सर्वात महत्वाची असते हो. पैशासाठी स्वतःला विकणारी आणि आपल्याला गृहीत धरणारी माणसं कधीच जवळ करायची नाही असे मी ठरवले आहे. माझ्या कार्यक्रमात मी यांना खूप मान सन्मान देतो आणि यांच्या कार्यक्रमात हे आपल्याला ओळख द्यायला सुद्धा महाग होतात. अशी माणसं मेली तर यांच्या प्रेतालाही जाऊ नये इतकं माझं अशा स्वार्थी माणसांवर डोकं फिरतं. आणि म्हणूनच मी वारंवार सांगतो की पैसे आज आहेत उद्या नाही. पण आपण जपलेली आणि चांगली पारखून घेतलेली माणसं अगदी काहीही झालं तरी आपल्या सोबतच राहतात..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.