गुढी पाडवा अर्थात हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण या दिवसा पासून नविन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे .व रमजान ईद हा सण मुस्लिम बांधवांसाठी खुप पवित्र सण आहे. या मुख्य सणांचे महत्व असल्याने कसारा येथे कायदा सुव्यवस्था चांगल्याप्रकारे राहण्यासाठी कसारा पोलिस स्टेशनचे पी .आय . सुरेश गावीत यांच्या नेतृत्वाखाली कसारा परिसरात पोलिसांचा रुटमार्च घेऊन शांततेचे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कसाऱ्यातील लोक समंजस आहेत व हे सर्व लोक सर्वधर्मीय सण मोठ्या आनंदाने, एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने साजरे करतात याचा आम्हाला अभिमान आहे अशा भावना पी.आय. सुरेश गावित साहेबांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रासोबत बोलतांना व्यक्त केल्या..
- श्री. रमाकांत पालवे. ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.