कुमारी लिपिका सुनील बनसोडे हिच्या स्मरणार्थ डोंबिवलीतील ब्लेसिंग चाईल्ड होमच्या मुलांना भोजन..

शब्द खड्ग डिजिटलच्या माध्यमातून लिपिकाचा द्वितीय पुण्यस्मरण दिन डोंबिवलीत संपन्न..

सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव यांची भाची तथा शब्द खड्गच्या व्यवस्थापिका सौ. साईली सुनील बनसोडे यांची मुलगी लिपिका हिचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम डोंबिवली पश्चिमेच्या ब्लेसिंग चाईल्ड होम मध्ये आई - वडिलांविना पोरक्या असलेल्या छोट्या मुलांसोबत साजरा करण्यात आला. भोजना बरोबर स्वीट आणि आईस्क्रिम खाऊन मुले खुश झाली. लिपिकाला प्राणिमात्र, अबालवृद्ध, आणि अनाथांबद्दल विशेष कळवळा असल्याने तथा दानधर्म करणे हा तिचा जन्मजात पिंड असल्याने गेल्यावर्षी वृद्धाश्रमात कार्यक्रम केला. तर या वर्षी ब्लेसिंगच्या लहान मुलांसोबत कार्यक्रम साजरा केला. या प्रसंगी लिपिकाचे पप्पा सुनील बनसोडे, मामा शिवाजी जाधव, बाबू जाधव, मावशी लता जाधव, शब्द खड्गचे उपसंपादक विलास चव्हाण आणि बाबू पवार उपस्थित होते. 

येथील छोट्या मुलींनी गाणी आणि नाच करून उपस्थितांसमोर त्यांची कला सादर केली. विशेषतः नीता या मुलीचे गाणे आणि येथील केअरटेकर हंजनकर मॅडमच्या मुलीचा डान्स खूपच छान होता. हंजनकर मॅडम आणि सुजिल सरांच्या मिसेस या मुलांना खूप जीव लावतात हे पाहून खूप बरे वाटले.. 

ब्लेसिंग चाईल्ड होमचे सर्वेसर्वा सुजिल सर फोन नंबर- ९७७३४७८४३२ / ८८७९०२०६३७ या गरीब मुलांच्या राहण्या, खाण्या, आरोग्य आणि शिक्षणासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांचे हात मदत करणाऱ्यांनी बळकट करणे गरजेचे आहे. दानशूर व्यक्तींनी कृपया सुजिल सरांना मदतीचा हात देऊन या गरीब मुलांचे भविष्य उजळविण्यासाठी सहकार्य करावे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग..

384

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.