१९८० च्या दशकात तुफान गाजलेलं आणि अजूनही आपला ठसा तसाच जपून ठेवलेलं हे रंजना शिंदे यांनी गायलेलं गाणं तेव्हा रेडिओवर तुफान गाजलेलं. ते आजही तितकच लोकप्रिय आहे. लोकगीत आणि कोळीगीतांचा बादशहा असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या मधुकर पाठक यांचं संगीत या गाण्याला लाभलेलं आहे. गीतकार - प्रकाश पवार.. या गाण्याच्या माध्यमातून खेड्यापाड्यात त्याकाळी आया बायांना सहजपणे दात साफ करण्याचे दातवन, कंगवे, गंगावण ( केसाळी ), दाभण म्हणजे गोधडी शिवायला वापरली जाणारी जाड सुई, काजळ, लहान मुलांना नजर लागू नये म्हणून मनगटातल्या मनगट्या, पायातले वाळे.. आणि काळ्या मण्याची पोत म्हणजे सावित्री, रुख्मिणी सारख्या पतिव्रता आणि पतीचे आयुष्य वाढावे म्हणून या पोती वापरा असं ही खेड्यापाड्यात या गरजेच्या वस्तू विकायला आलेली बाई सांगत आहे. सोन्याला जसा जीव लावता तसाच या काळ्या मण्याच्या पोतीला लावा असाही या गाण्यातून संदेश दिला गेला आहे.
गायिका: रंजना शिंदे.. गीतकार - प्रकाश पवार..
दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी
दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी
बाई सूया घे ग दाभन घे
चकण्या डोळ्याच्या राधा बाई, तुम्हा काजळ शोभा देई
आखूड केसाच्या गोदा ताई, तुम्ही केसाळी वापरा बाई
टकमका बघतील साऱ्या जणी
कुंकू घ्या कुणी काळ मणी
दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी
बाई सूया घे ग दाभन घे
तुमच्या तानुल्या गुजीऱ्या बाळा, घ्या मनगटी पायात वाळा
तो गोरा असो की काळा, दृष्ट मण्यांच्या घ्या या माळा
पोपट बाहुली घ्या चिमुणी,
कुंकू घ्या कुणी काळ मणी
दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी
बाई सूया घे ग दाभन घे
जीव लाविता जसा सोन्याला, जपा बायानो काळ्या मण्याला
माग आयुक आपल्या धन्याला, काळी पोत घ्या बारा आण्याला
सावित्री अव: रुक्मीणी
कुंकू घ्या कुणी काळ मणी
दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी
बाई सूया घे ग दाभन घे
दाताच दातवन घ्या कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी
बाई सूया घे ग दाभन घे..
- संगीत : मधुकर पाठक..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.