कसारा वाशाळा फाटा येथे असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व चढ रस्ता बनविल्याने त्या रस्त्याचे काम नव्याने करून देण्यासाठी शिवसेना ( उध्दव ठाकरे गट ) कसारा शाखेच्या वतीने राजमार्ग प्राधिकरण यांना लेखी निवेदन देऊन आदोलनाचा इशारा दिला आहे..
सविस्तर वृत्त - कसारा गावा पासून एक किलो मिटर अंतरावर असलेल्या वाशाळा फाटा येथे राजमार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याचे काम करण्यात येत आहे त्या रस्त्याचे काम करत असताना खुप मोठ्या प्रमाणात चढाचा रस्ता बनविल्याने वाहन चालकांना रस्ता चढण्यास खुप कसरत करावी लागत आहे . तेथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे . तसेच रस्त्याचे काम पण निकृष्ट दर्जाचे केल्याने सदर रस्त्या बाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . कसारा - वाशाळा येथ़ील रस्त्याचे काम पुन्हा करून देण्यासाठी शिवसेना ( उध्दव ठाकरे गट ) कसारा शाखेच्या वतीने नाशिक ( पाथर्डी फाटा ) कार्यालय येथे जाऊन संबंधित अधिकारी यांना कसारा उबाठा शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदन दिले आहे. त्यावेळी बंधू सोडणर - उपतालुका प्रमुख , शंकर भगत - शाखा प्रमुख, आप्पा बेडकुळे - माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे , कृष्णा धोंगडे , पोपट लहाने याची उपस्थिती होती .
- श्री. रमाकांत पालवे. ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.