उन्हाच्या तडाख्याने आणि घामाने बेजार झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची खबर म्हणजे, मुंबई आणि महानगर प्रदेशांमध्ये या आठवड्यात हलक्या पावसाची तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे..
मुंबई : उन्हाच्या तडाख्याने आणि घामाने बेजार झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची खबर म्हणजे, मुंबई आणि महानगर प्रदेशांमध्ये या आठवड्यात हलक्या पावसाची तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या १ आणि २ एप्रिल रोजी मुंबईत हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते. मुंबईकरांना मात्र गेल्या आठवड्यापासून प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मंगळवारपासून आकाश काहीसे ढगाळ राहणार आहे. रविवारी सांताक्रुझ वेधशाळेत किमान २४.३ आणि कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढच्या ४८ तासांत, मुंबई शहरातील कमाल आणि कमान तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे, तसेच आकाश निरभ्र राहील.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.