काम पूर्ण होण्याआधीच मेट्रोच्या खांबांना ३४ कोटींची रंगरंगोटी-आदित्य ठाकरेंचा आरोप..

मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे आ. आदित्य ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर आणखी एक आरोप केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदित्य ठाकरे म्हणाले की, नगरविकास खात्यात ७४ कोटींचा रंगरंगोटी घोटाळा झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले..

मुंबईमध्ये एमएमआरडीएकडून मेट्रोची अनेक कामे चालू आहेत. ही कामे अजूनही काही ठिकाणी पूर्ण झालेली नाहीत. मात्र, काम पूर्ण होण्याआधी, गर्डर टाकण्याआधीच खांबाना रंगवण्यात आले आहे. म्हणजे काम पूर्ण होण्याआधीच फिनिशिंगचे काम केले जात आहे. अर्धवट बांधकामांवर कोणी रंगरंगोटी करते का? यासाठी जवळपास ७४ कोटी ४१ लाख ९२ हजार १७९ रुपये वापरण्यात आले आहेत. यासंदर्भात सीएमआरएस या संस्थेने एमएमआरडीएला पत्र लिहून काम पूर्ण होण्याआधी फिनिशिंगचे काम करण्यास मनाई केली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात या वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. हे काम नंतर पुन्हा केले जाणार आहे. म्हणजे ७४ कोटी वाया जाणार आहेत.

सरकारकडे जुन्या पेन्शन योजनाचे पैसे द्यायला पैसे नाहीत, दिवाळी बोनससाठी पैसे नाहीत, पगार द्यायला पैसे नाहीत, सोयाबीनला ७ हजारचा भाव द्यायला पैसे नाहीत, कापसासाठी पैसे नाहीत. मग ही वाढीव खर्चाची मंजुरी नेमकी कशासाठी, ती कोण देत आहे आणि हा घोटाळा नाही तर काय आहे? २३ तारखेला आमचे सरकार आल्यावर या सगळ्या घोटळ्यांची आम्ही चौकशी करणार आहोत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

7
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.