प्रगती महाविद्यालयाचे निवासी शिबिर उत्साहात संपन्न..

डोंबिवली : महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत सामाजिक बांधिलकी व राष्ट्रभक्ती देशप्रेम याचे शिक्षण हे राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एन.एस.एस या द्वारे प्रामुख्याने देण्यात येते..

ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रगती कला वाणिज्य महाविद्यालय डोंबिवली (पूर्व) राष्ट्रीय सेवा योजना  यांचे हिंदू सेवा संघ मामनोली, मुरबाड रोड कल्याण (प) येथे शुक्रवार २२डिसेंबर ते गुरुवार २८ डिसेंबर २०२३ दरम्यान सात दिवसीय निवासी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

सदर निवासी शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री मा. जगन्नाथ पाटील ( चेअरमन, ठा. जि. आ. शि. प्र. मं.) व प्रा. डॉ. ज्योती पोहाणे (प्राचार्या प्रगती महाविद्यालय) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिबिरात प्रामुख्याने जनजागृती पर पथनाट्य, तरुणाई व सामाजिक चळवळ, सायबर क्राईम,अंधश्रद्धा निर्मुलन, माहितीचा अधिकार, प्रथमोपचार, सर्पमित्र इत्यादी विविध विषयांवर माहितीपर व्याख्याने झाली.यात विद्यार्थ्याचे कलागुणांना वाव देण्यासाठी कॅम्प फायर देखील झाले. यात महाविद्यालयाचे ११० हुन अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते. रा.से.योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मुकेश पाटील व प्रा. यतिन केणे (कार्यक्रम अधिकारी) सात दिवस विद्यार्थ्यांच्या समवेत सहभागी होते. प्रा.डॉ.परमेश्वर गोरे, प्रा.डॉ.मनोज मकवाणा, ॲड. निखिल घोडके, कॉलेज सुप्रिटेंट मा. गुरुनाथ पाटील, प्रा. दिवाकर सिंग, यांसह कॉलेज मॅनेजमेंट पदाधिकारी , प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांसह अनेकांनी शिबिरास भेट दिली.

शिबिराचा कार्यक्रम समारोप मा. तुषार कोर (सरपंच, मामनोली) यांच्या हस्ते करण्यात आले.

- अभिजीत पवार.

286
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.