खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सुनील खर्डीकर हे या पुरस्काराचे आयोजक..
आज सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी अर्थात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात बोरसे सरांना हा पुरस्कार मिळाला. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून श्री लहु कानडे आमदार प्रकाश मुथा सिनेअभिनेत्री पल्लवी पाटील सुनील खर्डीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सुरेश बोरसे सर रेल चाईल्ड शिक्षण संस्थेच्या डोंबिवली पश्चिम येथे असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर येथे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि प्रत्येक गरजवंताला मदतीला हात देणारे व्यक्तिमत्व म्हणून बोरसे सर पंचक्रोशीत सुपरिचित आहेत. बोरसे सरांच्या कारकिर्दीत शाळेने अनेक उपक्रम राबविले, राबवित आहे. शाळेला अनेक पुरस्कार भेटले. सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक आणि बौद्धिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षक आणि पालकांसाठी सुद्धा सर सतत काही ना काही उपक्रम राबवित असतात. सर्वांगीण विकास म्हणजे काय असावा याचा आदर्श बोरसे सर शाळेत घालून देत आहेत. 'कार्यकुशल मुख्याध्यापक' हा पुरस्कार दिल्याबद्दल सरांनी आयोजकांचे आभार मानले आहेत आणि अशा पुरस्काराने पुन्हा नव्याने जोमाने काम करायला प्रेरणा मिळते अशा भावना शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रासोबत बोलतांना बोरसे सरांनी व्यक्त केल्या आहेत.. या पुरस्कारामुळे सरांवर शिक्षण विभाग आणि समाजाच्या सर्वच स्तरांवरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.