रात्र थोडी सोंगं फार..

विधानसभा २०२४ महाराष्ट्र निवडणुकांचा विचार करता रोज नवनवे किस्से पहायला, ऐकायला  मिळत आहेत. आता उमेदवारांच्या आणि काही पक्षप्रमुखांच्या बॅग तपासल्या जात आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी यांनी महाराष्ट्राची ही निवडणूक खूपच प्रतिष्टेची केलेली आहे. फडणवीस आणि शिंदे यांना आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची भीती वाटू लागली आहे का असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा रोजच प्रयत्न केला जात आहे. काही पत्रकार निःपक्षपातीपणे या निवडणुकांचा, राजकारण्यांचा आणि मतदारांचा आढावा घेत आहेत तर काही पत्रकार नेहमीप्रमाणेच बोटचेपेपणा दाखवत आहे. मुळात सर्वसामान्यांच्या अपेक्षा काय आहेत हे सांगणे मीडियाचे काम आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता कुणाच्या दावणीला बांधली जाऊ नये ही प्रामाणिक अपेक्षा आहे. 

आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायम शत्रू अथवा मित्र असत नाही. हे सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत म्हणून यांच्या भडकविण्याने कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडू नयेत. मतमोजणी नंतर कोण कुणाशी हात मिळवणी करेल हे येणार काळच सांगेल. पण या सर्व गदारोळात काही जणांची दुकाने कायमची बंद होणार आहेत. तर, काही जण नेहमीप्रमाणे मांडवली करून हातात काहीच नसतांना टिकून राहतील. लोकांमध्ये फिरतांना खूप लोक असे बोलतांना आढळले की ज्या राजकीय पक्षाचे पाचही आमदार निवडून येत नाहीत  त्यांच्या बाबतीत निवडणूक आयोग काही पावले उचलीत का नाही. मात्र, आपल्या घटनेने निवडणुकीला उभे राहण्याचा, मतदान करण्याचा हक्क, अधिकार  भारतीय नागरिकाला दिला असल्याने याबाबत काही होऊ शकत नाही. मात्र, आपली ताकद बघूनच डबघाईला आलेल्या पक्षांनी उमेदवार उभे करावेत. उगीचच याला त्याला आणि याच्या त्याच्याशी तडजोडी करून चांगल्या उमेदवारांना पाडण्यासाठी उमेदवार उभे करून निवडणूक कर्मचाऱ्यांचा त्रास वाढवू नये असे ही लोक उघडपणे बोलतांना दिसत आहे. 

पुढे काय होईल हे सांगणे खूपच धाडसाचे ठरेल. रात्र थोडी आणि सोंगं फार अशी परिस्थिती आहे. मात्र, सध्यातरी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

15
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2024. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.