संपादकीय : महाराष्ट्रात रहायचं तर मराठी भाषा यायलाच हवी..

'मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही', असे वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी म्हटल्याने वादळ उठले आहे. आणि हे वादळ उठायलाच हवे..

पैसे कमविण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबईत राहणार आणि इथेच कामविणार, खाणार आणि इथल्या भाषेशी मातीशी इमान नाही राखणार हे चूक आहे. खरं तर अशा लोकांची चपलेने थोबाडं आणि काठीने ढुंगणं लाल करायला हवीत. मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची.. असे आता नाही चालणार हो. मराठी माणूस आदरतिथ्य करणारा आहे माणुसकीवाला आहे. पण, याचा अर्थ मराठी माणूस कमजोर आहे असा मुळीच नाही.  भारतातल्या परराज्यात त्यांची स्थानिक भाषा बोलली जाते. ते लोक त्यांच्या लोकल भाषेचा मान राखतात. मात्र, आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबईत आपण मराठी असूनही समोरच्याशी हिंदीत बोलतो. आपल्या आपल्यातही मराठीत बोलत नाही आपण.. का आपण असे वागतो, आपल्याला मराठी बोलण्याची लाज वाटते का ? आपल्या मराठीचा आदर आपणच करायला हवा. मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी १०६ लोकांनी हौतात्म्य पत्करलं आहे याची आपण जाण ठेवायलाच हवी.

भय्याजी जोशी जी गुजराथी भाषा नाचवित आहेत हे केवळ भाजपाला खुश करण्यासाठी. शिवसेना आणि मनसे हे जी मराठी माणसांची आणि मराठी भाषेची बाजू मांडीत आहेत त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. इथल्या प्रत्येक परप्रांतीयाला मराठी भाषा बोलता यायलाच हवी. आपण या लोकांशी बोलतांना मराठीतच बोलायचे. परदेशात ते लोक आपल्या भाषेत बोलत नाहीत उलट आपणच इंग्रजीत बोलतो. तात्पर्य काय तर त्यांना त्यांच्या भाषे बद्दल प्रेम आहे आपल्याला नाही. भाजपचे सरकार आल्यावर बोरिवलीतील गुजराथी दुकानदार मराठी ग्राहकांना दात दाखवीत असल्याचे मागे एकदा कानी आले होते. मराठी माणसांवर परप्रांतीयांनी हल्ला केल्याचे सुद्धा निदर्शनात आले. मुळात चूक आपलीच आहे आपण आपली मराठी दैनंदिन व्यवहारात घरात आणि घराबाहेर बोलायलाच हवी. ज्याला महाराष्ट्रात राहायचं आहे त्याने मराठी शिकावी आणि नसेल मराठी शिकायची तर जावे आपल्या राज्यात असे बोलल्यास वावगे ठरू नये. कशाला आणि का या लोकांची मुजोरी आपण सहन करायची. कुणीही सोम्या गोम्या उठतो आणि मराठीला टपली मारून जातो. अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा.. अगोदरच यांच्यामुळे मराठी माणूस मुंबई सोडून अगदी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, पनवेल पर्यंत दूर फेकला गेला आहे. याला मराठी माणूस सुद्धा कारणीभूत आहे. थोड्याशा पैशाच्या मोहापायी मुंबईतील घरं विकून आपण दूर दूर चाललो आहे.. जर असेच चालले तर आपल्यालाच आपल्या घरातून बाहेर पडण्याची मुश्किल होईल आणि मराठी माणसांना हे लोक देशोधडीला लावतील..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

20
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.