शतानुशतके रसिक वाचकांच्या हृदयावर आपल्या जादुई लेखणीने अधिराज्य गाजवणारा शब्दांचा किमयागार, नाटकांचा पितामह अर्थात विल्यम शेक्सपिअर!!
विल्यम शेक्सपिअरचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी युरोमध्ये स्टेटफोर्ड अपॉन अव्हान (इंग्लंड) झाला होता. आज संपूर्ण जगात कोरोना महामारीने आकांडतांडव माजवले आहे. अशाच प्रकारचे मृत्यूचे भयाण थैमान "ब्युबॅनिक प्लेग" ने विल्यमच्या जन्मकाळात युरोपमध्ये माजवले होते. आजच्या सारखेच प्लेगच्या काळात युरोमध्ये सर्वत्र लॉकडाऊन होते. या लॉकडाऊनच्या काळातील जगाला ईश्वराने दिलेली सुंदर भेट म्हणजे विल्यम शेक्सपिअर!
स्टेटफोर्डचे सधन व्यापारी रॉबर्ट आर्डेन व मेरी आर्डेन यांच्या घरी विल्यामचा जन्म झाला. जन्मजात सुबत्ता लाभलेल्या विल्यमने आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. बालवयातच नशिबाच्या अनेक झळा सोसल्याने मनुष्याचे आयुष्य हे नशिबाच्या हातातील कळसूत्री बाहुली आणि आहे असे समजत होते. मनुष्याच्या आयुष्याचे सर्व सूत्रधार नशीब आहे हे त्यांनी आपल्या अनेक नाटकांतून दाखविले आहे. विल्यमच्या अँथेल्लो या नाटकातील
"Who can control his fate" या वाक्यांतून विल्यामची विचारसरणी स्पष्ट होते.
घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे विल्यम आपले शिक्षण अर्धवट सोडून कामधंदा करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान वयापेक्षा ८ वर्षाने मोठ्या असलेल्या अँन हॅथवे यांच्याशी झाला. त्यांना दोन मुली व एक मुलगा होता. त्यांचे संयुक्त कुटुंब होते. छोट्या, मोठ्या कामातून त्याच्या कुटुंबाचे भागत नसे. त्यामुळे ते लंडनला एका मित्राच्या छापखन्यात काम करू लागले. याचबरोबर ते अनेक जोडधंदे करत असत. परंतु त्यांचे मन कुठेही स्थिर नव्हते. आपल्याला ह्याहून काहीतरी वेगळे करायचे आहे असे त्यांना नेहमी जाणवायचे. बल्यावयापासून नाटकाची आवड असलेले विल्यम नाट्यगृहाबाहेर सतत रेंगाळत राहायचे. नाटकं पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचे घोडे सांभाळण्याचे काम करायचे. त्याचबरोबर नाट्यगृहात डोकावून बघून रंगमंचावरील कलाकारांची सर्व गुण कौशल्ये आत्मसात करायचे. कधीकाळी एखादा नट उपस्थित नसेल तर अशावेळी त्याची भूमिका विल्यम साकारू लागले. अल्पावधीतच ते एक उत्तम नट म्हणून प्रेक्षकांसमोर आले. अभिनयासोबत ते नाटक बांधणीचे काम करू लागले. त्यांच्यातील नाटककार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मग त्यांनीच स्वतः नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. विश्वाला ३९ महानाटकांचं दान त्यांनी दिलं आहे. त्यापैकी १० ऐतिहासिक, १७ सुखात्मिका तर १२ शोक नाटकं आहेत. त्यांच्या नाटकांचे वर्गीकरण कल्पनारम्य नाटके, गंभीर नाटके, शोकांतिका, सुखात्मिका, प्रणयरम्य नाटके, ऐतिहासिक नाटके जाणकारांनी असे केलेले आहे. दुसरा रिचर्ड, तिसरा रिचर्ड या ऐतिहासिक नाटकांतून विल्यमने अतिच्युतम प्रतिभेचे प्रदर्शन घडवले आहे.
अँथेल्लो, किंग लियर, मॅकबेथ, रोमियो अँड ज्युलियट, हॅम्लेट विल्यमच्या या शोकांतिका जगप्रसिद्ध आहेत.
विल्यम शेक्सपिअर महान नाटककार तसेच "बार्ड ऑफ अव्हान" म्हणून ओळखले जाणारे महाकवी होते. गावाकडे गेल्यावर आपल्या शेतात काम करतांना देखील ते गाऊन कविता म्हणायचे. त्यांनी आपल्या साहित्य प्रवासात अनेक प्रदीर्घ काव्य लिहिले आहेत. "सुनिते" ही वैशिष्ट्यपूर्ण काव्यनिर्मिती त्यांनी साहित्य विश्वाला अर्पण केलेली आहे. (Sonnets = 12+2= 14 ओळींची कविता) हे त्यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य आहे. अंदाजे १५४ सुनिते त्यांनी रचली आहेत. त्यांची अ लहर्स कंप्लेंट, द पशनेट, पिल्ग्रिम, द रेप ऑफ ल्युक्रेसी, व्हिनस अँड ऍडानिस हे दिर्घकाव्य सुप्रसिद्ध तसेच प्रसंशनिय आहेत.
सन १९९२ साली युरोपमध्ये प्लेगच्या साथीला थांबवण्यासाठी पुन्हा टाळेबंदी झाली. १४ महिन्याच्या टाळेबंदीच्या काळात विल्यमने रोमियो अँड ज्युलियट हे अतिशय रोमांचकारी व शोकांतिक नाटक लिहिले. टाळेबंदीच्या काळातही विल्यमची लेखणीने अनलॉकचा उच्चांक गाठला.
सर्व जगात प्रसिद्ध असलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचे साहित्याचे अनुवाद जगातील लॅटिन, इंग्रजी , फ्रेंच, मराठी, हिंदी नव्हे तर अनेक भाषांतून झाले आहेत. त्यांच्या लिखाणातील एकही ओळ अशी नाही की ती पुन्हा वाचावी वाटणार नाही. त्यांच्या जीवनाची खरी ओळख ही रोमियो आणि ज्युलियट या शोकांतिके पासून झाली. या नाटकाने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहचवले. तशी प्रत्येक साहित्य कृती ही वाचकांसाठी एक पर्वणीच ठरवायची. इंग्लडची राणी एलिझाबेथ तर विल्यम व त्यांच्या साथीदारांनी काढलेल्या " Lord Chamberlain's Men " या नाटक कंपनी ची विशेष चाहती होती. अनेक महत्वाचे प्रसंगी या नाटक कंपनी ला विशेष आमंत्रण देऊन नाटक सादर करण्यास बोलावले जायचे.
विल्यम शेक्सपिअर यांना 'फादर ऑफ द ड्रामा' असे संबोधले जाते. गेली चार शतके त्यांची नाटके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यावेळी नाटकांच्या छापील प्रती सहजपणे बाजारात उपलब्ध होत नसत त्यामुळे विल्यम शेक्सपिअर यांनी स्वतः एक कंपनी काढून नाटकांच्या प्रती प्रकाशित करणे सुरू केले . नाटक लेखनाला सोबतच ते नाटकात कामही करीत असत. विल्यम हे एक चांगले अभिनेते होते. नाटकांमुळे खूप लवकर ते प्रसिद्ध व्यक्ति म्हणून ख्यातनाम झाले. त्यांनी ग्लोब थिएटरमध्ये भागीदारी केली व लकवरच ते स्टेटफोर्ड मधील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिध्द झाले.
मराठीतील अनेक प्रसिद्ध लेखकांनी विल्यम शेक्सपिअर यांच्या जीवन व साहित्य लेखनावर माहितीपर लिखाण केले आहे त्यात प्रामुख्याने प्रभाकर देशपांडे साखळीकर (परभणी) यांनी कादंबरी लिखाण तसेच विल्यम शेक्सपिअर यांच्या काही नाटकांचे मराठीत अनुवाद केले आहे. तसेच परशुराम देशपांडे हे सुद्धा विल्यम शेक्सपिअर यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत त्यांनी " राजहंस एव्हनचा शेक्सपिअर " भाग १ व भाग २ यात विल्यम यांचे संपूर्ण जीवन चरित्र व साहित्यिक योगदान याबद्दल सविस्तर लिखाण केले आहे.
सर विल्यम शेक्सपिअर यांचे साहित्य वाचन करतांना मी काही लिहून ठेवलेल्या नोंदी
"काळाची हिमगार चार दशके, मित्रा तुला वेढूनी
जेव्हा खंदक खोदतील गहिरे भालप्रदेशावरी
गर्वे यौवनवेष जो मिरवीशी तू आज साऱ्या जनी
त्याच्या केवळ जीर्ण शीर्ण उरती चिंध्याच देहावरी....."
"संपली आता आपली गंमत. हे आपले रंगकर्मी, मी आधीच सांगितल्याप्रमाणे, होते सगळे सुक्ष्मात्मे, विरून गेले आहेत हवेत, अगदी सूक्ष्म हवेत आणि पायाविना उभारलेल्या या दृश्यासारखे मेघमुकुटमंडित मिनार, रम्यसुंदर राजप्रासाद, दिव्योदत्त देवलंय आणि साक्षात प्रचंड पृथ्वीगोल, होय, त्यावरचा चरचरासाहित विरून होईल लुप्त. आणि या विरून गेलेल्या अभासमय देखाव्याप्रमाणे, आपल्यामागे ठेवणार नाही एक साधा ढगदेखील. आपण आहोत त्याच द्रव्याचे, स्वप्न घडतात ज्यापासून आणि आपलं अल्पसं आयुष्य एका निद्रेत जातं आटोपून."
रंगभूमीचा निरोप घेतांना विल्यम शेक्सपिअर यांनी काढलेले उदगार,
"आता माझी मंत्रशक्ती मी दिली फेकूनी सगळी उरले केवळ माझे स्वतःचे दुबळेपण हे जवळी."
वाचकांच्या मनाचा वेध घेऊन लिहिणारे विल्यम शेक्सपिअर वाचकांच्या मनात कायम अजरामर राहिले आहेत. समकालीन साहित्यिक बेन जॉन्सन म्हणतात,
"He was not of an age, but for all time."
अशा या महान साहित्यिकाला मानाचा मुजरा देण्यासाठी ही छोटीशी लेखात्मक आदरांजली.
- लेखिका..
निशा डांगे/नायगांवकर ( पुसद ) Phone No : 8421875487
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.