काठी व्हावी माणुसकीची
लोटा त्यावर मानवतेचा
तिरंगा वसनाने सजवा
निरामय, सात्विक देह गुढीचा
बांधा साखर्या प्रेम-प्रितीच्या
विविधतेतून एकतेची माळ
सर्वधर्मसमभाव पाहुनी
स्तब्ध व्हावा क्षणभर काळ
शिक्षित व्हा, सुरक्षित व्हा
धर्म, पंथ, जातीचा ठेवा मान
कष्ट, कर्तृत्वची गुढी उभारून
उंच करा भारताची मान
शत्रुत्त्वाचा कडुलिंब गिळून
गुढी उभारा बंधूभावाची
ओवा, कैरी, गूळ मिश्रित
आंबट गोड चव मित्रत्वाची
गुढी उभारू एकात्मतेची
मान-शान आपला संविधान
सोडा हिरवे, भगवे, निळे
गाणे गाऊ तिरंगा अभिमान
- श्रीमती कल्पना दिलीप मापूसकर
मीरा रोड
90826 46494
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.