आपल्या भारतीय सणांचे महत्व आणि संस्कृती तथा परंपरा जोपासून ती नव्या पिढीला कळावी म्हणून शिवनाथ टॉवर सतत कार्यरत..
आजच्या धावपळीच्या आणि फक्त स्वतःचं स्वतःपुरतंच बघणाऱ्यांच्या जमावात डोंबिवली पश्चिमेची शिवनाथ टॉवर सोसायटी सतत उपक्रमशील राहून तरुणांना आपली परंपरा जोपासण्याचे प्रोत्साहन देत आहे.
आज रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी रांगोळ्यांचे सडे, भगव्या पताका, श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि जयहनुमानाच्या घोषणा देत अवघे वातावरण श्रीराम मय कसे होते हे शिवनाथ सोसायटीने अवघ्या परिसराला दाखवून दिले.
सतत काहीतरी नवीन आणि विधायक करण्यात अग्रेसर असलेल्या नागेंद्र राय, सिद्धेश आडारकर, शिवाजी कदम, दिपक बाविस्कर, साईली बनसोडे, मंगल पाटील, नेहा नकाशे, शिवाजी कदम आणि सोसायटीच्या सर्वच सभासदांनी हा श्रीरामनवमी सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपली संस्कृती आणि सण काय आहेत हे नव्यापिढीला कळावे म्हणून आपण सतत अशा स्वरूपाचे एकोपा वाढीविणारे कार्यक्रम करीत रहायच्या भावना नागेंद्र राय, सिद्धेश आडारकर आणि साईली बनसोडे यांनी याप्रसंगी बोलून दाखविल्या..
- सौ. साईली सुनिल बनसोडे. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.