परी.. प्रेम हें ठरवून.. कधीच होत नसतं..

परी 

 प्रेम हें ठरवून 

 कधीच होत नसतं 

 तारुण्यातील फुलणाऱ्या भावनेला 

थांबवून ठेवणं थोडस कठीणच असत..

पण चंचल मनानं 

ठरवलेलं त्याच प्रेमाच

गणित मात्र 

एकदम पक्क असत..

मन आणि डोळे 

यांच मैत्रीच नातं 

थोड घट्टच असत 

प्रेम हें ठरवून कधीच होत नसतं..

भिरभीरणाऱ्या शोधक नजरेची 

नजर पडते जिच्यावरी 

तीच असते आपल्या पहिल्या 

पहिल्या प्रेमातील सुंदर परी..

- प्रफुल्ल अंदुरकर ' प्रेमकवी ' ( पुणे)

57
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.