विद्या विस्तार पटल, मुंबई यांनी डोंबिवली पश्चिमेच्या भागशाळा मैदानात विविध धार्मिक आणि सर्वांगीण माहितीने भरलेली पुस्तके आणि साहित्य स्टॉलच्या माध्यमातून विचारांच्या उन्नतीसाठी आणि समाजाचा दर्जा उंचावण्यासाठी अथक परिश्रम सुरु केले आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन गायत्री परिवार डोंबिवलीच्या टीमने केलेले आहे. अत्यंत भक्तिभावाने भारावलेले कथा कीर्तन आणि फार मोठया प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेल्या भागशाळा मैदानात डोंबिवली, कल्याण, भिवंडी, मुंबई, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्र तथा युपी, बिहार मधून आलेल्या लोकांनी मैदान फुलून गेले आहे. या कार्यक्रमात शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्गचे व्यवस्थापक सुनिल बनसोडे यांचा आयोजकांनी सत्कार केला. १०८ कुंडिया गायत्री महायज्ञाने संपूर्ण वातावरण भारावून गेले आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिनेश आंचन, सुनील भोसले, दिनकर सिंग, ओंकार यादव, देवेंद्र सैनी, मनीष दुबे आणि भिवंडी युवा संघ खूप परिश्रम घेत आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.