विशेष बातम्या

ताजी बातमी

शब्द खड्गच्या पाठीराख्या श्रीमती नलिनी कृष्णा जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी रविकांत जाधव यांच्या मोठ्या वहिनी श्रीमती नलिनी जाधव यांचे आज मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी कल्याण येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले..

'चीन आणि भारताने 'ड्रॅगन-एलिफंट टँगो' मध्ये संबंध मजबूत करावेत: राष्ट्रपती शी जिनपिंग.....

भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या अभिनंदनपर संदेशात, शी यांनी दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांना "ड्रॅगन-एलिफंट टँगो" असे संबोधले, जे भारत आणि चीनच्या प्रतीकात्मक प्राण्यांमधील सुसंवादी..

'७५ व्या वर्षी निवृत्ती नाही, भाजपमध्ये पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ ठरवू शकत नाही,' असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात.....

भारतीय लोकशाहीमध्ये पंतप्रधानांचा कार्यकाळ हा निवडणूक आदेश आणि जनतेच्या पाठिंब्याने ठरवला जातो, राऊतसारख्या व्यक्तींकडून नाही, असे बावनकुळे म्हणाले..

कसारा येथे मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी .. सणाला गालबोट लागू नये म्हणून कसारा पोलिसांचा चोख बंदोबस्त.....

रमजान ईद मुस्लिम समाजचा खूप पवित्र सण आहे. या सणाला ईद - उल -फित्र म्हटले जाते . हा सण मुस्लिम बांधवांना आनंदात व उत्साहात साजरा करण्यात यावा यासाठी कसारा पोलिस स्टेशनचे पी.आय. सुरेश गावित यांनी..

ईद २०२५: वर्षातून दोनदा शुभ दिवस का साजरा केला जातो ते जाणून घ्या.....

ईद हा मुस्लिमांद्वारे साजरा केला जाणारा सर्वात प्रमुख सण आहे. जगभरात साजरा केला जाणारा हा शुभ सण रमजानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीचे प्रतीक आहे. ईद अरबी भाषेतून आली आहे, ज्याचा अर्थ उत्सव किंवा..

म्यानमारमध्ये भूकंपानंतर मृतदेहांची दुर्गंधी; आधुनिक साधनांच्या अभावामुळे हाताने मलबा हटवण्याचे प्रयत्न.....

म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपानंतर मंडाले शहरातील रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली आहे..

मुंबई, ठाणे परिसरात दोन दिवसांत पावसाचा शिडकावा.....

उन्हाच्या तडाख्याने आणि घामाने बेजार झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची खबर म्हणजे, मुंबई आणि महानगर प्रदेशांमध्ये या आठवड्यात हलक्या पावसाची तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली

मुंबईत मराठीच बोलले पाहिजे - राज ठाकरे.....

परप्रांतातून मुंबईत येतात आणि सांगतात की मराठी बोलणार नाही, मराठी बोलला नाहीत तर कानफटीतच बसणार, असा इशारा देतानाच महाराष्ट्रात, मुंबईत मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे, असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण..

निवडणुकीतील सर्व आश्वासने पूर्ण करणार - शिंदे.....

कर्ज माफी देता येणे सध्या शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी बँकांमध्ये पैसे भरावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले असतानाच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सरकार निवडणूक जाहीरनाम्या

१ एप्रिलपासून वीज होणार स्वस्त; १० टक्क्यांची कपात; राज्य सरकारचा निर्णय.....

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून पुढील पाच वर्षे स्वस्त दरात वीज मिळणार आहे..

रेस्टॉरंटमधील सक्तीचे सेवा शुल्क बेकायदेशीर; मुंबई ग्राहक पंचायतीच्या लढ्याला यश.....

दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, सेवा शुल्क किंवा टिप ग्राहकाने स्वेच्छेने द्यायची रक्कम असून ती सक्तीची असू शकत नाही..

कामराविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल.....

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून विडंबनात्मक गाणे गाणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..

म्यानमारमध्ये १६४४ बळी; ४३०० जखमी, शनिवारी पुन्हा भूकंपाचा धक्का.....

म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपातील बळींचा आकडा १६४४ झाला असून ४३०० जण जखमी झाले आहेत. मात्र, बळींचा आकडा दहा हजारांपेक्षा अधिक असू शकतो..

गुढी पाडवा.. सणासुदीच्या निमित्ताने कसारा येथे पोलिसांचा रुटमार्च ........

गुढी पाडवा अर्थात हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण या दिवसा पासून नविन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे .व रमजान ईद हा सण मुस्लिम बांधवांसाठी खुप पवित्र सण आहे..

माझ्या मनातील पाडवा.....

शिशिराने निरोप घेतलाय पानगळतीतून सर्जनाची बीजं रुजती करुन ....थंडीची शिरशरी संपून उष्म्याची काहिली सुरू झालीय ...हा ऋतूपालट चराचरातुन चैतन्य विखरून कुसुमाकराच्या आगमनाची वर्दी घेऊन आलाय...

गुढी माणुसकीची.....

काठी व्हावी माणुसकीची लोटा त्यावर मानवतेचा..

रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा बेंच.. अत्यंत गर्दीत जगणारी मुंबई आणि बरंच काही.....

स्वप्नं पूर्ण करणारी मुंबापुरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. पोटात भूक आणि डोळ्यात शेकडो स्वप्नं घेऊन इथे देशभरातून हजारो लोकांचे तांडे रोज येत असतात. शहराला आता हात पाय पसरायला देखील जागा उरलेली..

रिक्षा, टॅक्सींची संख्या मर्यादित ठेवता येईल का? हायकोर्टाची परिवहन विभागाला विचारणा.....

रिक्षा आणि टॅक्सींना मर्यादित संख्येत ठेवण्यासाठी मुक्त परवाना धोरण रोखले जाऊ शकते का, याबाबत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने परिवहन विभागाच्या आयुक्तांना दिले आहेत..

कसारा येथे धोकादायक रस्त्याचे काम केल्याने .. त्या विरोधात शिवसेना उबाठा करणार आंदोलन.....

कसारा वाशाळा फाटा येथे असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व चढ रस्ता बनविल्याने त्या रस्त्याचे काम नव्याने करून देण्यासाठी शिवसेना ( उध्दव ठाकरे गट ) कसारा शाखेच्या वतीने राजमार्ग प्राधिकरण..

भारतीयांनी १.१ लाख कोटी तास घालवले मोबाइलमध्ये.....

सध्या रस्त्यात चालताना, मेट्रो, बस, लोकल, रेस्टॉरंट, विमानतळ, विमान, बगीचात बसलेले असताना जिकडे तिकडे एकच दृश्य दिसते ते म्हणजे प्रत्येक जण मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेला आहे..

दिशा सालियन प्रकरण: क्लोजर रिपोर्टमध्ये वडील सतीश सालियन यांचे अफेअर आणि आर्थिक विश्वासघात हे तिच्या आत्महत्येमागील कारण असल्याचे उघड झाले आहे.....

क्लोजर रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की अयशस्वी प्रकल्प आणि मित्रांसोबत गैरसमजांव्यतिरिक्त, दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा गैरवापर ठाणे येथील त्यांच्या मसाल्याच्या उत्पादन..

'त्या' इमारतीमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.....

डोंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही प्रकारे बेघर होऊ देणार नाही, त्यांचे संरक्षण करण्यास शासन समर्थ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात..

खरं बोललेलं सख्ख्या आईला सुद्धा पटत नाही म्हणतात.....

हल्ली खरं बोलणं हा जणू गुन्हा झाला आहे. आपण एखाद्याला अगदी मैत्रीत्वाने आणि साध्या शब्दांत त्याची उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केल्यास ती समोरची व्यक्ती आपल्यावर नाराज होते आणि आपल्याशी बोलणे सोडून..

प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मराठीचे मारक आपणच ठरत आहोत.....

महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात पैसे कमवायचे, महाराष्ट्रात खायचं, महाराष्ट्रात सोयी सुविधा घ्यायच्या आणि तरी मराठी भाषा मात्र येत नाही म्हणून मराठी बोलायची नाही. का असं होतंय तर मराठी माणूस..

श्री समर्थ कृपा स्पेशल निड स्कुलच्या विद्यार्थ्यांसोबत मैत्रेय चा वाढदिवस संपन्न.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांचा श्री समर्थ कृपा स्पेशल निडचे संचालक श्री. विनोद सूर्यराव यांनी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन केला सत्कार..

मनातल्या वाटांवर.....

मनातल्या वाटांवर आपण अनुभवलेल्या भल्या बुऱ्या आठवणींच्या पाऊलखुणा आपल्याला नियमित भेटत असतात. आपल्यापैकी खूप लोक जगण्याचा सोहळा करण्या ऐवजी माझं तुझं करण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालवतात. जे चाललंय..

भाव भावनांच्या हिंदोळ्यावर माझी कविता झुलते.. कधी काट्यांवर तर कधी फुलांत मला तोलते.....

जागतिक कविता दिनाच्या माझ्या सर्व कवी कवियत्री मित्र, मैत्रिणींना हार्दिक शुभेछया..

पैशासाठी माणुसकीचा कडेलोट.....

समाजकारणी, संपादक, लेखक - दिग्दर्शक आणि त्याही पेक्षा एक तळागाळात आणि गरजवंत दीन दुबळ्यांबरोबर वावरणारा सामान्य माणूस म्हणून मला नेहमीच वेगवेगळे चांगले आणि वाईट अनुभव नियमित येत आहेत..

छडी लागे छमछम.....

छडी लागे छमछम विद्या येई घम घम छम छम छम.. श्यामच्या आई या प्रल्हाद केशव अत्रे यांच्या राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या सिनेमात छोट्या श्यामच्या तोंडी म्हणजे तेव्हाचे बाल कलाकार माधव वझे यांच्या तोंडी हे.

अनुभवाचे बोल.. प्रोत्साहन देतांना घ्यावयाची काळजी.....

पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे कुसुमाग्रजांना म्हणणारा त्यांचा विद्यार्थी मेहनती होता. प्रोत्साहन देणे वाईट नाही. बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसं आपल्या मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक प्रोत्साहनाने

जगणे ही एक कला आहे.. प्रत्येकालाच ते जमते असे नाही.....

अगदी काहीही झालं इतर चित्ती समाधान आणि प्रसन्न असायला हवे. आपल्या संतांनी सुद्धा हेच सांगितले आहे. प्रत्येकाचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काही लोक सर्वकाही जवळ असूनही सतत कण्हत कुथत..

सोबतीला कुणी हवं.....

प्रत्येक वेळी एकला चलो रे.. म्हणून चालत नाही हो.. आपण कितीही शहाणे असलो तरी आयुष्य आपण समजतो तितकं सोपं नसतं..

डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर मध्ये जागतिक महिला दिन सोहळा संपन्न.....

शनिवार ८ मार्च २०२५ रोजी रेल चाईल्ड संस्थेच्या डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर येथे मान्यवर महिलांचा, माजी विद्यार्थिनी तथा महिला पालक प्रतिनिधी यांचा सत्कार..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने डोंबिवली महिला पोलिसांसाठी घेतलेला जागतिक महिला दिन सोहळा धुमधडाक्यात संपन्न.....

शनिवार ८ मार्च २०२५ डोंबिवली विभागात असलेल्या सर्व पोलीस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी, महिला पोलिस, महिला होमगार्ड, रेल्वे स्वच्छक महिलावर्ग, पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या महिला वकील, आणि रेल्वे..

संपादकीय : महाराष्ट्रात रहायचं तर मराठी भाषा यायलाच हवी.....

'मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही', असे वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी..

मनातलं पान : ' अति राग आणि भीक माग..'...

रागाने अनेकांची आयुष्य उध्वस्त झालेली आहेत. मात्र, यातून बोध घेणारे फार कमी लोक असतात. राग आणि घमेंड या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. घमेंडखोर माणसं खूपदा रागीट असतात. या रागाचे सुद्धा दोन प्रकार आहेत

संपादकीय : आज कालच्या मॉर्डन मम्मी.....

सन्माननीय अपवाद वगळता.. पूर्वी आई होती.. काळ बदलत गेला आणि आईची मम्मी झाली.. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वीकारायलाच हवा त्यात अजिबात दुमत नाही. मात्र, मुलीचं लग्न झालं की त्यांच्या आयांचा..

मनातलं पान : आतल्या गाठीच्या माणसांपेक्षा मोकळ्या मनाची माणसं दिलखुलास असतात.....

काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार आहे या वास्तवाची ज्याला जाणीव आहे तो सगळ्यांशी हसून खेळून आणि मोकळ्या मनाने राहतो. आणि जो अतिशय आतल्या गाठीचा असतो तो तोंडावर गोड गोड बोलतो मात्र मनातून अतिशय कपटी..

दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी.....

१९८० च्या दशकात तुफान गाजलेलं आणि अजूनही आपला ठसा तसाच जपून ठेवलेलं हे रंजना शिंदे यांनी गायलेलं गाणं तेव्हा रेडिओवर तुफान गाजलेलं. ते आजही तितकाच लोकप्रिय आहे..

मनातलं पान : आपले आणि परके.....

आपले आणि परके यातील सीमारेषा फार पुसट असते फक्त ती रेषा आपल्या पटकन लक्षात येत नाही. किंवा येऊनही आपण त्याकडे छे असं होऊच शकत नाही असं आपल्या मनाशीच बोलून दुर्लक्ष करतो..

म्हातारा नवरा गंमतीला.....

रोशन सातारकर यांचं आणखी एक बहारदार गाणं इथे सादर करीत आहे. पूर्वीच्या काळी लोकगीतं आणि तमाशाच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे वास्तव मांडलं जात होतं..

माझ्या नवऱ्याने सोडलीय दारू बाई देव पावला ग..!!...

रुख्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी त्यांच्या दमदार आवाजात गायलेलं हे लोकगीत लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिले आहे आणि लोकगीतांना, लावण्यांना जबरदस्त संगीत देण्यात ज्यांचा हातखंडा होता असे बहारदार..

आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं.....

आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं..जाग आली तेव्हा मला काही कारण नसतांना फारच अस्वस्थ वाटलं.. अ हं.. चुकताय हो तुम्ही.. अस्वस्थ माझ्यासाठी नाही तर माझ्या काही चांगल्या आणि वाईट मित्र मैत्रणींसाठी..

शब्द खड्ग चा 'तेरे सूर और मेरे गीत..' धुमधडाक्यात संपन्न.....

रविवार २३ फेब्रुवारी २०२५ चा दिवस शब्द खड्गने गाजवला..

मनातलं पान : एकटेपणा जागरूकता दिन.....

कधी कधी गर्दीचा खूपच त्रास होतो. खूपदा माणूस गर्दीत सुद्धा मनाने एकटाच असतो. एकटेपणा काही काळासाठी खूप सुखावह वाटतो. पण, कायमस्वरूपी एकटेपणा माणसाला वेड लावू शकतो..

परी.. प्रेम हें ठरवून.. कधीच होत नसतं.....

तारुण्यातील फुलणाऱ्या भावनेला थांबवून ठेवणं थोडस कठीणच असत..

मनातलं पान : चिंता माणसाला आतून पोखरते मात्र काही लोक इतरांच्या वेदनेने आनंदी होतात.....

चिंता आणि चिता या गोष्टी तसे पाहिल्यास फारच जवळच्या आहेत. माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला मात्र हे मान्य नाही. ती आनंदी असल्याने आणि तिच्या आनंदात माझ्यासारखा बहुआयामी व्यक्ती आनंद मानून तिला सतत..

व्हॅलेंटाईन्स डे.. बेडक्यांचे बैल आणि हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्या बाया.....

प्रेमासाठी आपल्या जीवनाचे सर्वोच्य बलिदान करणाऱ्या संत व्हॅलेंटाईन्स यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रेमदिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारी साजरा केला जातो. खरं तर मानवा बरोबरच पशु पक्षी आणि वृक्षवल्लीवर..

मनातलं पान : खुल्या मनाने रहा आणि बिनधास्त जगा.....

ओठात एक आणि पोटात एक.. सतत याच्या त्याच्या दडपणाखाली.. याला काय वाटेल, हिला काय वाटेल.. हा काय बोलेल तो काय बोलेल.. आणि जगण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो 'तेरी भी चूप और मेरी भी चूप'..

मनातलं पान : लेखकाच्या लेखणीची कथा आणि व्यथा.....

आज मी जवळपास सर्वच लेखक आणि कवी मंडळींच्या मनातलं प्रातिनिधिक बोलतोय.. होतं काय की विविध प्रकारच्या कथा असो, सुख दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या कविता असो अथवा एखादा लेख, चारोळी, दुनोळी, एकोळी अथवा..

मनातलं पान : प्रॉमिस डे.....

प्रॉमिस डे ची सुद्धा मोठी गंमतच आहे नाही.. आई वडिलांना व्यवस्थित सांभाळण्याचे स्वतः स्वतःला प्रॉमिस करायचे, भाऊ- बहिणींशी , पती-पत्नीशी, मित्र- मैत्रिणींशी आणि देशाशी प्रामाणिक राहून आपल्या बरोबर..

मनातलं पान : हा छंद जीवाला लावी पिसे आणि शब्द खड्ग.....

मित्रांनो अगदी दहावी अकरावीला असल्यापासून म्हणजे गेल्या वीस वर्षां पेक्षा जास्त वर्ष मी स्वतःच्या हिमतीवर विविध कार्यक्रम करतोय. ज्या मध्ये काव्योत्सव असतील, व्यख्यानं असतील, अभिनय असेल, सामाजिक..

मनातलं पान : खाण्यासाठी जन्म आपला.....

मानवी उत्क्रांतीच्या काळात कंद मुळे खाऊन गुहेत राहणार माणूस जेव्हा नदी किनारी रहायला आला व त्याला आगीत भाजलेल्या मांस तथा इतर गोष्टींचा स्वाद लक्षात आला तेव्हापासून वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या..

मनातलं पान : प्रपोज डे आणि बरंच काही.....

प्रेम व्यक्त करायला आज लोकांना विशिष्ट डे लागतो हे पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. अहो प्रेम व्यक्त करायला जर तुम्हाला एखादा दिवस लागत असेल आणि त्या समोरच्याला अथवा समोरचीला तुमचं प्रेम व्यक्त..

मनातलं पान : हसण्यासाठी जन्म आपला.....

आयुष्यात सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असतं.. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ असतो. म्हणून सतत दुःख कुरवाळीत बसण्यात काही अर्थ नसतो..

मनातलं पान : ' मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया..' ...

कधी कधी आयुष्यात अनेक चिंता आणि संकट येतात.. माणसं आपल्या जवळ येतात आणि स्वतःची चूक लक्षात न घेता आपल्या पासून दूर निघून जातात. पण, म्हणून जगणं सोडायचं नसतं. आई नसलेलं तान्हं बाळ सुद्धा या दुनियेत..

मनातलं पान : संशयाचं भूत.....

एकवेळ भांडखोर स्वभाव परवडला पण संशयखोर स्वभाव अजिबात परवडत नाही.. संशयाचं भूत एकदा का तुमच्या मानगुटीवर बसलं की ते वेताळ सारखं घट्ट चिकटून बसतं. संशयाचे किडे डोक्यात गेले की मग ते किडे हातपाय पसरू..

मनातलं पान : अर्ध औषध..अर्ध प्रेम.. अर्धी मैत्री आणि अर्ध सत्य कधीच आनंद देत नाही.....

मैत्री असो, प्रेम असो, नातेसंबंध असो अथवा दुश्मनी असो.. जे करायचं ते बिनधास्त आणि पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देऊन करायचं.. एकतर काहीही करण्या अगोदर, कुठल्याही नात्यात पडण्या अगोदर शंभरदा विचार..

मनातलं पान : ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.....

मॉल मध्ये महागडी वस्तू घेतांना किंमत कमी करा म्हणून अजिबात घासाघीस न करणारे ९९ टक्के लोक बाहेर टोपली घेऊन बसलेल्या गरीब भाजीवालीशी दोन पाच रुपये कमी कर म्हणून वादावादी करतात. खरं तर उन्हातान्हात..

मनातलं पान : आंधळ्यांच्या शहरात आरसे विकण्यात काही अर्थ नाही.....

खरं तर आंधळ्यांच्या शहरात आरसे विकणे हा शुद्ध वेडेपणा आहे. पण, तरी काही लोक तो वेडेपणा करतात कारण त्या आंधळ्यांत सगळे नजरे समोर मिट्ट काळोख दिसणारे असणारे आंधळे नसतात. तर, बरेचसे डोळस आंधळे असतात..

मनातलं पान : आतले.. बाहेरचे आणि मनातलं मनात दाबून ठेवणारे.....

माणसाच्या स्वभावाबद्दल आजवर अनेकदा बोललं गेलंय लिहीलं गेलंय.. आजवर अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी मनाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप मन नक्की काय आहे हे कुणालाच पूर्णपणे कळलेले नाही.

मनातलं पान : पानिपतच्या युद्धात विश्वास मारला गेल्याचा लावला गेलेला अर्थ आणि नात्यांची गुंतागुंत.....

१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अब्दालीत पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. मराठ्यांच्या समशेरीची चपराक आणि धसका अब्दालीला जबरदस्त बसला.. पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले, २७ मोहरा..

मनातलं पान : आकाश व्यापून उरायचं असेल तर स्वतः आकाश व्हा आणि आपल्या माणसाला कवेत घ्या.....

आकाश होणं तितकसं कठीण नाही हो.. फक्त ते होण्यासाठी स्वतःकडे दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा. आकाशाच्या छत्रछायेखाली आलेल्या पांथस्थाला कवेत घेऊन त्याचे दुःख दूर करण्या एवढे मोठे व्हा.. राग लोभ प्रत्येकालाच..

मनातलं पान : पैसा झाला मोठा पण माणुसकीला मात्र तोटा.....

लक्ष्मीच्या घरी सरस्वती पाणी भरते असं म्हणतात ते काही खोटं नाही. तुमच्याकडे फक्त हुशारी असून आजच्या जगात अजिबात चालत नाही. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला आणि तुमच्या हुशारीला कुणीही विचारीत नाही..

मनातलं पान : आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते.....

आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते..म्हणून माणसाने नेहमी आनंदी आणि बिनधास्त राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी रहायला प्रत्येकच वेळी खूप पैसे लागतात असे ही नाही..

मनातलं पान : लोक काय म्हणतील.. चुगलखोर मित्र मैत्रिणी आणि बरंच काही.....

आज खूपशा गोष्टी लोक काय म्हणतील म्हणून घाबरून आपण करीत नाही. आपली आवड निवड छंद आणि समोरचा चांगला की वाईट यावर मारला गेलेला शिक्का सगळं लोकांना घाबरून करायचं अथवा नाही करायचं..

गाण्यात श्वास गुंतला.. रेखा से रेखा तक चा रेखाचा धगधगता प्रवास.....

ती मनस्वी आहे.. कुणाच्या अध्यात मध्यात नाही.. प्रामाणिक आहे.. सर्वात महत्वाचं म्हणजे गाणं तिचा श्वास आहे. मी हे बोलतोय ते नाशिक येथील सुप्रसिद्ध गायिका.. भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट कामगार..

मनातलं पान : पाटलाचं घोडं चाकराला भूषण.....

आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणे वाईट नाही. मात्र समोरचा त्याची गरज काढून घेतोय हे कळायला हवे. काही मंडळी स्वतःला मान मिळावा अथवा मोठेपण मिळावे म्हणून अतिरिक्त काम अंगावर ओढून घेतात..

मनातलं पान : छंदाने आयुष्याची फुलबाग बहरते.....

आल्या जन्मात मनुष्याला एक तरी चांगला छंद जोपासता यायलाच हवा. आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली बहुतांश स्त्री पुरुष दबलेले असतात. आयुष्य कधी सुरु झालं आणि आयुष्याची संध्याकाळ कधी जवळ आली हे रोजच्या..

मनातलं पान : माणूस माणसापासून दूर चालला आहे.....

कुणी कितीही नाकारलं तरी सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस माणसापासून दूर चालला आहे असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही. पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.